Sangli : देशात अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार होत असतो. या भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक छोट्यामोठ्या कामांसाठी लाच मागून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. असाच एक प्रकार सांगली येथे घडला आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने लाच मागणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
एका आरटीओ अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने अंगावरचे कपडे काढले. ते घेऊन तो अधिकाऱ्याच्या मागे धावला. हे पाहून तो अधिकारी पळून गेला. हा अजबगजब प्रकार सांगली येथील कडेगावमध्ये घडला आहे.
कडेगावमध्ये आयोजित आरटीओ कॅम्पमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवी त्यांची कार पासिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका आरटीओ अधिकाऱ्याने त्यांना लाच मागितली. ते पाहून प्रमोद मांडवी यांना त्या अधिकाऱ्याची प्रचंड चीड आली. त्यामुळे त्यांनी थेट आपल्या अंगावरचे कपडेच काढले.
त्यानंतर ते आपले कपडे हातात घेऊन त्या अधिकाऱ्याच्या मागे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रमोद मांडवी यांनी असे विचित्र कृत्य करून भ्रष्ट अधिकाऱ्याला चांगलाच धडा शिकवला असल्याचे बोलले जात आहे.
त्यांनतर संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्याचा कडेगाव येथे हार घालून सत्कार करण्यात आला. अनेकांनी त्या अधिकाऱ्याच्या विरोधात घोषणाही दिल्या. यावेळी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, जीवन करकटे आमी विजय माली इत्यादी लोक उपस्थित होते.
एका अधिकाऱ्याने कुठलेही कारण नसताना लाच मागितली. त्यामुळे प्रमोद मांडवी यांनी त्याला तुपाच्या पद्धतीने धडा शिकवला. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर संबंधित आरटीओ अधिकाऱ्याला शिक्षा होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
मुंबई विमानतळावर सापडलं १५ कोटींचे सोन्याचं घबाड, ATS च्या हाती लागली धक्कादायक माहिती
Asia Cup: पुरुषांना नाही जमलं ते महिलांनी करून दाखवलं; ७ व्या वेळी पटकावला आशिया कप, श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव
Rohit Sharma : पाकीस्तानविरूद्धच्या सामन्याचे महत्व आम्हालाही माहीत आहे, पण..; कट्टर चाहत्यांना रोहीतने झापले
Harry Potter: सर्वांच्या आवडत्या हॅरी पॉटरच्या ‘हॅग्रीड’चे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; चाहत्यांवर शोककळा