Share

Bhimashakar : पुन्हा एकदा अग्नितांडव! २९ भाविकांना घेऊन भीमाशंकरला निघालेली बस पेटली

Nashik-bus-truck-accident-

Bhimashakar : राज्यात सध्या बसला आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच आता भीमाशंकर येथे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. मंचर-भीमाशंकर रोडवरील शिंदेवाडी इथे ही घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

एक खाजगी प्रवासी बस कल्याणवरून भीमाशंकरला प्रवासी घेऊन जात होती. आज (बुधवार) सकाळी ७ वाजताच्या दरम्यान या बसने अचानक पेट घेतला व ही बस जळून खाक झाली. सुदैवाने यातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.

या बसमध्ये जवळपास २९ प्रवाशी प्रवास करत होते. हे सर्व प्रवाशी भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात होते. बसला आग लागल्याचे कळताच स्थानिक लोकांच्या व पोलिसांच्या मदतीने या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

याआधीही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली होती. नाशिकमध्ये एका खाजगी बस आणि ट्रॅक्टरची धडक होऊन मोठा अपघात घडला. या अपघातानंतर खाजगी बसने पेट घेतला व यात सुमारे १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

त्यानंतर आता भीमाशंकरला जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतल्याची ही घटना घडली आहे. या घटनेतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यामुळे देवदर्शनासाठी जात असलेले भक्त मृत्यूच्या तोंडातून बाहेर आले असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान, नाशिकमधील घटना ताजी असतानाच आता ही घटना घडल्याने सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. बसने पेट घेतल्याच्या सलग घडलेल्या या घटनांमुळे खाजगी बसच्या प्रवासावर आता शंका वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
jayant patil : शिंदेंनी पोटनिवडणूकीत ठाकरेंचा उमेदवार पळवल्यास…; पुढे काय होणार जयंत पाटलांनी स्पष्टच सांगीतलं
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भर रस्त्यात फ्रिस्टाईल हाणामारी; मशाल रॅलीच्या स्वागतावरून झाला वाद
NCP : अंथरुणाला खिळून असतानाही १७ वर्षे पक्षसेवा करणारा राष्ट्रवादीचा योद्धा हरपला, शेवटी अजितदादांचा डिपी लावला अन्..
Marathi Movies : ‘शिवाजीराजं आग आहेत त्या आगीशी खेळू नकोस’; हर हर महादेवचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now