Thackeray group : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडून जवळपास 3 महिने झाली आहेत. त्यांनी भाजपा सोबत हातमिळवणी करून राज्यात सरकार ही स्थापन केले. मात्र इकडे ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिवसेनेतील दोन गटात उभी फुट पडल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळे नाव आणि चिन्ह दिले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव दिले. तर निवडणूक चिन्ह म्हणून मशालीच चिन्ह देण्यात आले आहे.
तर शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे. तर शिंदे गटाला दोन तलवारी आणि ढाल असलेले चिन्ह देण्यात आले आहे. ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर चांगलाच नाराज झाला आहे. त्यांनी शिंदे गटाला देण्यात आलेल्या नावावर आक्षेप घेतला आहे.
तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या चिन्हावरून नवीनच वाद सुरु झालेला आहे. ठाकरे गटाला देण्यात आलेले मशालीचे चिन्ह हे आमच्या पक्षाचे आहे. असा दावा समता पक्षाने केला आहे. ते त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगात दाद देखील मागणार आहेत.
समता पक्षाची स्थापना दिवंगत समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडीस यांनी केली होती. पण या पक्षाला निवडणुकीत कधीच फारस यश मिळवता आले नाही. या पक्षाने दावा केला आहे की, 1996 पासून मशाल हे चिन्ह समता पक्षाकडे आहे. आता ठाकरे गटाला हे चिन्ह देण्यात आले आहे.
तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाने 2004 सालीच समता पक्षाची नोंदणी रद्द केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने मशाल या चिन्हाला मुक्त चिन्हांच्या यादीत टाकले होते. त्यामुळे समता पक्षाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : महापालिका निवडणूकीत मनसे भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी जाहीर केला ‘हा’ निर्णय
विनायक राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधवांचा पाय खोलात; ‘या’ केसमध्ये पोलिसांनी केली कठोर कारवाई
Eknath Shinde : मतदार म्हणून आम्हाला काही किंमत नाहीये का? नाना पाटेकरांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले…