Share

Uddhav Thackeray : ‘तुमच्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील’; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सणसणीत टीका

Uddhav Thackeray Eknath Shinde

Uddhav Thackeray : शनिवारी शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आले. या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेईमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफजल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद, असे म्हणत या अग्रलेखातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

तसेच महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील!, अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे.

पुढे या अग्रलेखात म्हटले की, निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. जगात न्याय आहे असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे.

कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रिपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही, असे म्हणत दीपक केसरकर यांनाही यावेळी धारेवर धरले आहे.

भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

तसेच पुढे या लेखात लिहिले की, याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहे पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशिर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : ‘धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार’, कारण..; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची रेकाॅर्डींग व्हायरल
Sanjay Raut : चिन्ह गोठवल्याचा फायदा आम्हालाच होणार; संजय राऊतांनी थेट जेलमधून सांगीतला ‘हा’ ॲंगल
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं ‘मशाल’ चिन्हांसोबतचं ‘हे’ भावनिक पत्रक होतयं व्हायरल; काय आहे नेमकं प्रकरण वाचा
Shahajibapu patil : आधी म्हणले पवारांनी शिवसेना संपवली, आता म्हणतायत, पवार माझं दैवत; शहाजीबापूंचं चाललंय काय?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now