Mulayam Singh Yadav : जेष्ठ समाजवादी नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचे काल निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांना 2 ऑक्टोंबर रोजी मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. मुलायम सिंग यादव हे उत्तर प्रदेशच नाहीतर देशातील मोठे राजकारणी होते.
ते आपल्या राजकीय कारकिर्दीत 3 वेळा उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी केंद्रात ही 2 वर्ष सुरक्षा मंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता. ते या देशातील एक महत्वाचे समाजवादी चळवळीतील नेते होते. मुलायम सिंग यांचा जन्म इटावा जिल्ह्यातील सैफई या गावात 22 नोव्हेंबर 1939 मध्ये झाला होता.
त्यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी आपल्या मागे मोठा राजकीय वारसा आपल्या कुटुंबाला सोपवला आहे. त्यांचे राजकीय वारसदार म्हणून आधी त्यांचे लहान भाऊ शिवपाल यादव यांच्याकडे पाहिले जात. परंतु त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच अखिलेश यादव यांना आपला राजकीय वारसदार नेमले.
तसं पाहिला तर मुलायम सिंग यांच्यावर सतत घराणेशाहीचा आरोप लावल्या जात. त्यांनी राजकीय पद देतांना प्रत्येक वेळी आपल्या घरातल्या व्यक्तीला प्राधान्य दिले. एकेकाळी त्यांच्या घरातील कमीत कमी 40 सदस्य कोणत्या ना कोणत्या राजकीय पदावर विराजमान होते.
बहुजन समाज पार्टीला हरवून 2009 साली जेव्हा समाजवादी पार्टी सत्तेत परत आली. तेव्हा राजकीय जाणकार मुलायम सिंग यादव चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे सांगत होते. पण त्यांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री पदी बसवले आणि समाजवादी पक्षाचे नेतृत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढी कडे सोपवले.
पण त्यांनी आपल्या पाठीमागे फक्त राजकीय वारसाच सोडला नाही, त्यांनी आपल्या मागे आपल्या परिवारासाठी कोठ्यावधी रुपयाची संपत्ती ठेवली आहे. मुलायम सिंग यादव यांनी 2019 साली शेवटची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील एका प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाला दिला होता.
या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती. त्यांच्याकडे 10 कोटीची शेत जमीन, इटावामध्ये एक घर आणि 17 लाखांची एक कार पण त्यांच्याकडे होती. सोबतच त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न सुद्धा 32 लाखापेक्षा जास्त होते.
इतक्या मोठ्या संपत्तीचे मालक असताना सुद्धा मुलायम सिंग यांच्यावर 2 कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांनी आपल्या मुला कडून म्हणजेच अखिलेश यादव यांच्याकडून घेतले होते. त्यांनी हे कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले होते हे मात्र स्पष्ट केले नव्हते.
महत्वाच्या बातम्या
IND vs SA: फायनल वनडेआधीच आली बॅडन्यूज; भारताचे मालिका जिंकण्याचं स्वप्न तुटणार, कारण..
Uddhav thackeray : ‘देशपातळीवर भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करा’; प्रमुख विरोधी नेत्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
Dipak Kesarkar : शिंदेगटाच्या नेत्याकडून पवारांचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘ते तर भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह…






