Uddhav Thackeray : नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी येथील मैदानावर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे आणि शिंदे या दोघांनी एकमेकांना चांगलेच धारेवर धरले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांवरही शाब्दिक वार केला. बाप मंत्री, कारटं खासदार आणि पुन्हा नातू नगरसेवक पदासाठी डोळे लावून बसला आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केले होते. यावर एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली होती.
माझा नातू रुद्रांश हा एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरु झालं. कोणावर टीका करताय? त्या दीड वर्षाच्या बाळावर?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच तुम्ही मुख्यमंत्री झाले तुमचा मुलगा मंत्री झाला आम्ही काही बोललो का?, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
तसेच आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गट आणि भाजपकडूनही जोरदार टीका केली जात आहे. दीड वर्षाच्या लहान मुलाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात नको करायला हवा होता, अशा प्रतिक्रिया सगळीकडून उमटत आहेत. यातच आता माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोणावरही टीका करत असताना राजकारणात अपशब्द वापरले जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्याही घरापर्यंत किंवा नातवापर्यंत जाऊ नये, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी राज्याच्या राजकारणावर नाराजीही व्यक्त केली आहे.
दसरा मेळाव्यांनंतर उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. यावर एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
udhav thackeray : दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा चर्चा मात्र आनंद शिंदेंची; वाचा काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन?
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम