Dussehra Gathering : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. त्यानिमित्ताने दोन्ही गटाने दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
नुकतेच दोन्ही गटाने दसरा मेळाव्याचे टीझरही लॉन्च केले आहे. यातच आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला एक कट्टर शिवसैनिक सातासमुद्रापार येत आहे. त्याचे नाव अक्षय राणे असे आहे. अक्षय हा बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणारा आणि उद्धव ठाकरेंवर श्रद्धा असलेला एक कट्टर शिवसैनिक आहे.
अक्षय हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून नोकरीसाठी अमेरिकेमध्ये गेला. त्यांनतर तो हळूहळू रशिया, फ्रांस, दुबई, इटली असा प्रवास करत आता फ्लोरिडामध्ये आहे. तो आता एवढ्या लांबून इकडे मुंबईला दसरा मेळाव्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्याचे अक्षयला समजल्यानंतर तो निराश झाला. त्याने त्याच्या इथल्या मित्रांना उद्धव ठाकरेंना सोडू नका असे फोन करून सांगितले. तसेच शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याने तिथे फ्लोरिडामध्ये पेढे वाटले.
त्यानंतर आता तो ८० हजार रुपयांचे विमानाचे तिकीट काढून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला आला आहे. यावेळी तू केवळ दसरा मेळाव्यासाठी एवढ्या लांब का आलास?, असे त्याला एकाने विचारले. यावर तो म्हणाला की, मी एक मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्रप्रेमी म्हणून माझ्या माणसांना पाठिंबा द्यायला आलो आहे.
अक्षयसोबत त्याचा तिकडचा एक मित्रदेखील येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही कारणामुळे तो येऊ शकला नाही. अक्षयचे फ्लोरिडाचे मित्रही तिथून हा दसरा मेळावा बघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अक्षयने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेण्याची ईच्छाही दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे