Sushma Andhare : “आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

Sushma Andhare : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून वाद सुरु होता. त्यांनतर कोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे.

दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा चांगला होईल, याची चुरसही रंगलेली आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाचा टीझर समोर आला आहे. या टीझरवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, विद्यमान मुख्यमंत्री नवे नवे विधीभक्त झालेत आणि त्यांचा दसरा मेळाव्याच्या संदर्भाने एक टीझर बघितला. एकपक्ष, एकनेता, एकविचार, एकलव्य, एकनाथ सगळं कसं छान जमून आलंय. फक्त एकनिष्ठ हा महत्वाचा शब्द तेवढा गायब आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, तसंही व्यावसायिक लोकांचं आणि निष्ठा या शब्दाचं काही नातं असण्याचं काहीच कारण नाही. आम्हाला त्यावरती फार भाष्यही करायचं नाही. कारण तुमच्याकडे वातानुकुलीत बसेस, ५० खोक्यातून सोडलेल्या ट्रेन, पंचतारांकित हॉटेलातील जेवण सगळ्या सुविधा असतील.

मात्र, जो वंदनीय बाळासाहेबांचा विचार प्रमाण मानतो तो आमचा शिवसैनिक आपल्या कष्टाची भाकरी खाऊन पायी चालत शिवतीर्थापर्यंत पोहोचेल. तसेच हा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा मेळावा शिवतीर्थावर ऐतिहासिक मेळावा असेल, याची साक्ष उभा महाराष्ट्र देईल, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंवर कडवी टिका करणाऱ्या डॅशींग नेत्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
Uddhav Thackeray : याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार, उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या नवनीत राणांना अंधारेंनी झापलं
sushma andhare : कुटुंब संकटात असताना साथ सोडून जाणं हा हिंदुत्वाचा संस्कार असू शकत नाही; शिवसेनेची वाघिन कडाडली
Politics: “उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा आणि राज ठाकरेंना कामे मिळत आहेत”