Bacchu Kadu : बच्चू कडूंनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणाचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावात एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी बच्चू कडू गेले होते. त्यावेळी बच्चू कडू यांच्याकडे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. पुढे यावरूनच तिथे वाद पेटला. त्यानंतर बच्चू कडूंनी संतापून त्यांच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, जे काही दाखवले गेले ते सगळं खोटं आहे. मी गेल्या २०-२५ वर्षांपासून कार्यकर्त्यांना जपत आलो आहे. यातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले आहेत.
तसेच सौरभने त्या गावात भरपूर काम केलं आहे. मात्र, या बातमीच्या माध्यमातून त्याला आणि मला दोघांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी फक्त त्याला थांब म्हटलं. एवढाच प्रकार मारहाणीपर्यंत गेला आहे. अशा बातम्या पसरवल्यास त्याचे आम्हाला दुःख होते. याचा कार्यकर्त्यांवर वाईट परिणाम होत असतो.
तसेच कार्यकर्त्यांसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. उलट एखाद्यावेळी आमच्यापेक्षा एखादा मोठा कार्यकर्ता आम्हालादेखील रागवून बोलत असतो. त्यामुळे या घटनेचा एवढा विपर्यास करणे चुकीचे आहे. सौरभ इंगोले असे बच्चू कडूंच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला की, काहीही घडलेलं नाही. केवळ खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार होता. विरोधकांना खोटी प्रसिद्धी हवी असल्याने हा प्रकार करण्यात आला आहे. बच्चू भाऊंनी फक्त मला ‘थांब रे’ असे म्हटले होते. तो व्हिडीओ रंगवून आणि एडिट करून व्हायरल केलेला आहे, असे त्याने सांगतले आहे.
महत्वाच्या बातम्या
Bachhu kadu : दुसऱ्याला खोटी प्रसिद्धी हवी होती म्हणून, बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावलेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट
bacchu kadu : अन् संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली; वाचा नेमकं काय घडलंय?
Bachchu Kadu : ‘संजय शिरसाटांची गुवाहाटीच्या तर बच्चू कडूंची सुरतच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन’
bachchu kadu : शिंदेंची डोकेदुखी वाढणार! बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? वाचा नेमकं काय म्हंटलंय बच्चू कडूंनी?