Uddhav Thackeray : अखेर आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा प्रश्न निकाली लागला आहे. आता शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.
या सगळ्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना, उत्साह अमाप आहे पण एकजूटसुद्धा तशीच ठेवा, अशी विनंती त्यांनी शिवसैनिकांना केली आहे. तसेच आपल्याला निवडणुकीत प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे. पालिकेवर शिवरायांचा भगवा फडकवायचाच आहे, असेही ते म्हणाले आहेत.
निवडणूक आल्यानंतर रुसव-फुगवे, गट-तट अजिबात होऊ देऊ नका. कारण त्यावेळी उमेदवारी फार मोजक्या लोकांनाच देता येते. त्यामुळे आता आपली उमेदवारी म्हणजे भगवा झेंडा आहे. आता विजयाच्या तयारीला लागा, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले आहे.
निकालानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून महापालिकेकडे अर्ज करण्यात आला होता.
परंतु, महापालिकेने सुरुवातीला यासंदर्भात कुठलाच निर्णय दिला नाही. त्यांनतर महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे याबाबत न्याय मागण्यासाठी शिवसेना हायकोर्टाकडे गेली होती. आजच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या संघर्षात ठाकरे गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून सर्वत्र आनंद साजरा करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे
politics : आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल; शिंदे गटातील नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक