Foxconn : महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरु आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे.
दुसरीकडे, सत्ताधारीही विरोधकांना सडेतोड उत्तर देत आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही फॉक्सकॉन प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, शिंदे सरकार यायला केवळ दोन महिने झाले आहेत. एखादी कंपनी स्थापन करण्यासाठी त्या कंपनीचा मालक हा वर्षभरापासून प्लॅन करत असतो. त्यामुळे तो यापूर्वीच्या सरकारला निश्चितच भेटला असेल. दोन महिन्यांपूर्वीच कंपनीने सगळी प्रोसेस केली असेल, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार टक्केवारीची डीलिंग न झाल्याने हा प्रकल्प बाहेर गेला आहे. याआधीच्या सरकारची डील न झाल्याने हा प्रकल्प बाहेर पडला. तसेच याबाबतचे पुरावेही मी समोर आणणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच हा प्रकल्प गुजरातला जाण्यामागे तीन व्यक्ती जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यात त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई या तीन व्यक्तींना जबाबदार धरले आहे.
उपनेतेपद न मिळाल्याने नाराज असण्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मी अजिबात नाराज नाही. मात्र, वारंवार माझ्या नाराजीच्या बातम्या पसरवण्यात येत असतात आणि याचा मला खूप त्रास होतो. त्यामुळे यापुढे जर मला न विचारता नाराजीच्या बातम्या पसरवल्या तर मी मानहानीचा दावा दाखल करेल, असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, शिंदे साहेबांसोबत आम्ही मंत्रिपद आणि उपनेतेपद यातलं काही मिळवण्यासाठी गेलेलो नाही. आम्ही त्यांच्यासोबत एका ध्येयासाठी गेलो आहोत आणि ते ध्येय आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी कायम शिंदे साहेबांसोबतच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Nitish kumar : . .तर मी राजीनामाच देतो, भर बैठकीत मुख्यमंत्र्यांनी झापलं तर संतापला मंत्री, दिली राजीनाम्याची धमकी
Shivsena : शिवसेनेत पुन्हा इनकमिंगला सुरवात; माजी आमदारासह काॅंग्रेसचा राज्य पातळीवर बडा नेता सेनेत दाखल
Shinde Group : शिंदे गटातील बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार आला समोर; जावयाच्या माध्यमातून झाला मोठा घोटाळा
Sanjay Shirsat : मंत्रीपद नाकारल्यानंतर संजय शिरसाटांना पुन्हा धक्का; एकनाथ शिंदेंनी पुन्हा डावललं






