Bachchu Kadu : नुकतीच शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांनी राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बच्चू कडू हे आज न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
मात्र, बच्चू कडूंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बच्चू कडूंना गिरगाव कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. परंतु, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. १४ दिवसांची कोठडी सुनावत त्यांना कोर्टाने ताब्यात घेतले आहे. बच्चू कडूंबाबतच्या या माहितीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू हे अचलपूर विधानसभेचे अपक्ष आमदार आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून आले आहेत. बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. याआधीही त्यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. विशेषतः शेतकऱ्यांविषयीचे त्यांचे आंदोलन प्रचंड गाजलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Jayant Patil : महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ‘राजा’ला साथ नको! मनसेकडून ‘एकला चलो रे’चा नारा
वेदांता प्रकल्प पुन्हा राज्यात येणार! विरोधकांच्या टीकेपुढे सरकार नमले; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट पंतप्रधानांना फोन
स्कुल बसचालकाचा चिमुकलीवर बलात्कार, २४ तासांत आरोपीच्या राहत्या घरावर बुलडोझर!