Share

Varsha Usgaonkar : हिसका दाखवताच वर्षा उसगावकरांनी हात जोडून मागीतली कोळी समाजाची माफी; म्हणाल्या…

Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar  : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. एका ऑनलाईन मासे विक्री करणाऱ्या ॲपची जाहिरात त्यांनी केली होती. यात त्यांनी कोळी महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यामुळे कोळी महिलांकडून त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला गेला. मात्र, आता याबद्दल त्यांनी कोळी महिलांची माफी मागितली आहे.

‘यामिली’ या मासे विकणाऱ्या ॲपसाठी वर्षा उसगावकर यांनी जाहिरात केली होती. यात त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिलांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे वर्षा उसगावकर यांनी आमची माफी मागावी अन्यथा त्यांना सडलेले मासे खाऊ घालू, असे कोळी महिलांनी म्हटले होते.

तसेच दोन वेळच्या जेवणासाठी जीवाचे रान करत कष्ट करणाऱ्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. यातून गरिबांविषयीची मानसिकता स्पष्ट होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले होते. तसेच ही जाहिरात सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली होती.

त्यांनतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली आहे. तसेच वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत या कोळी समाजाची माफी मागितली आहे. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

यावेळी त्या म्हणाल्या, “नमस्कार मी वर्षा उसगावकर. यामिली ॲपबद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. उलट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कोळी समाजातील बंधू-बघिणींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते.”

“मला मासे खायला आवडतात. बाजारात जाते तेव्हा अनेकदा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः जे पापलेट बाजारात खूप ताजे असल्यासारखे वाटतात. त्या पापलेटला घरी आल्यानंतर इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे मला वाटले व मी निराश झाले. त्यावेळी माझ्या आयुष्यात हे खासगी ॲप वरदान स्वरूपात आले,” असे वर्षा उसगावकर या जाहिरातीत म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या
अखेर छडा लागला..! पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराचा हात; स्वत: कबुली दिली, वाचा काय म्हंटलंय?
Devendra Fadanvis : मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदेच्या जागेवरही भाजपचा दावा; फडणवीस म्हणाले उरलेल्या शिवसेनेबाबत…
VIDIO : मर्सिडीजमधून आलेली एक व्यक्ती थेट रेशन दुकानात गेली; पुढे झालं असं काही की पाहून तुमची झोप उडेल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतं ठाकरे गटाची थेट मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका, वाचा काय म्हंटलंय?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now