Shivsena : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या संदर्भात एक बैठक घेतली. त्यांनी ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. राजकारणात धोका सहन करु नका. जे धोका देतात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले पाहीजे. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असे ते म्हणाले.
अमित शाहांच्या या वक्तव्याला शिवसेनेने आता प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना यावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंवरील टीका आम्ही सहन करणार नाही. शिवसेनेला कोणीच संपवू शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच त्यांना जमीन दाखवू, असेही ते म्हणाले. “मोदींच्या आणि फडणवीसांच्या नावावर मतं मागून तुम्ही जिंकला आणि विश्वासघात केला,” असे अमित शाह म्हणाले होते. यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमचे बोट पकडून निवडून आलेले आता आम्हालाच संपवायला पाहत आहे.
हे जर आता उद्धव ठाकरेंनी धोका दिला असे म्हणत असतील तर ती गोष्ट चीड येण्याजोगी आहे, असेही खैरे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना, आता भाजपला जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, असे संपूर्ण देश म्हणत आहे. आम्हीच त्यांना जमीन दाखवू, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
तसेच शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, कोण कोणाला धोके देत आहेत हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे. तसेच १५० जागांचा नारा हा आमचा आहे. भाजपने तो दिला म्हणजे त्यांनी आमची कॉपी केली आहे, असेही त्या म्हणाल्या
“२०१४ मध्ये फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईच्या राजकारणात भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
Kangana Ranaut : महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम, त्यांनी लग्नासाठी धर्म बदलला; अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट
Uddhav Thackeray : बाटग्यांच्या शिंदे गटाने घ्यायला दसरा मेळावा म्हणजे काय सुरती बाजारबुणग्यांचा मेळा आहे का?
शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी, सर्वांना मोफत वीज, ५०० ला गॅस सिलींडर; राहूल गांधींनी पाडला घोषणांचा पाऊस
शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; ठाकरे गटातील आमदाराने गायकवाडांना सुनावले