Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! माजी काँग्रेस आमदार शिवबंधन बांधणार, संतोष बांगर यांना देणार टक्कर

Uddhav Thackeray Santosh Bangar

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. तसेच भाजपशी हातमिळवणी करून आपले सरकारही स्थापन केले. त्यांनतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत.

शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु आहे. यातच आता आणखी दोघेजण आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे आणि शेतकरी नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित मगर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही नेते शिवबंधन बांधणार आहेत. डॉ. संतोष टारफे व अजित मगर हे दोघेही आज मातोश्रीवर पोहोचणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे टारफे म्हणाले आहेत.

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता कळमनुरीचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे व वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे संतोष बांगर यांच्यासाठी हे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची युती आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेसच्याच माजी आमदारांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे काँग्रेस नाराज होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसच्या या नाराजीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होतो का?, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

काँग्रेस अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर नाराज आहे. उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर काँग्रेस पक्षाची नाराजी आणखीनच वाढली. जेव्हा विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली होती, त्यावेळी शिवसेनेवर काँग्रेसने त्यांच्यासोबत चर्चा न केल्याचा आरोप लावला होता. तेव्हापासूनच काँग्रेसचे नेते शिवसेनेवर नाराज आहेत. त्यांनतर आता काँग्रेसच्या नेत्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ही नाराजी वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Pankaja Munde : ‘या’ बड्या नेत्याने पंकजा मुंडेंना दिली राष्ट्रवादीत येण्याची ऑफर, म्हणाले, रोहिणी खडसे आल्या तुम्हीही…. 
‘नोटांनी भरलेली बॅग, फडणवीसांचा फोन अन् मोहित कंबोज सुटला’; विद्या चव्हाण स्पष्टच बोलल्या
शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात ठोकला शड्डू; स्वत: उतरले मैदानात उतरले 
पाकिस्तानच्या पराभवानंतर शरद पवार चर्चेत; ‘हा’ व्हिडिओ सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now