Share

Marathi actress : पहिल्यांदा ताजमध्ये गेली अन् चहाची किंमत ऐकून हादरली; मराठी अभिनेत्रीने स्वतःच सांगीतला किस्सा

marathi actress

Marathi actress : मराठी इंडस्ट्रीतील उत्तम कलाकार, तसेच दुनियेची फिकर न करता सोशल मीडियावर बिनधास्त व्यक्त होणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने नुकताच तिचा ४२वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मुंबईचं ताज गाठणाऱ्या हेमांगीने पहिल्यांदाच ताजमध्ये गेल्यावर आलेला अनुभव चाहत्यांना शेअर केला. आणि त्या ठिकाणी घेतलेला चहा ज्याची किंमत पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. हे सर्व अनुभव आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहेत.

हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यामध्ये ती म्हणते, ‘मनापासून वाटायचं साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊन यायचं यार…४१ वर्ष मुंबईत राहून पण ताजमध्ये जायची हिंमत झाली नाही. कारण इच्छा असूनही आपण पडलो मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकांना हिम्मत गोळा करायला थोडा वेळ लागतो.’

‘लहानपणी कुठेतरी चित्रात ब्लॅक अँड व्हाईट रंगात पाहिलेले भव्य दिव्य ताज! बाहेरून बिल्डिंग इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! कोणी अडवलं तर? कोणी हाकलून दिलं तर? आणि समजा आत गेलोच तर, फक्त चहाची किंमत २५० ते ३०० रुपये. बापरे नको! असं म्हणत ताजकडे पाठ फिरवायचो,’ असं हेमांगी म्हणाली.

पुढे बोलताना हेमांगीने सांगितलं की, ‘मी आजही मध्यमवर्गीयच आहे. घर, गाडी, घरातील इमारतीला लिफ्ट, २४ पाणी, वीज, गाठीला थोडे पैसे ही सगळी साधनं.. परिस्थिती आता सुधारली आहे, तसं म्हणायला बरी आहे. पण मध्यमवर्गीय मानसिकता गळून पडलेली नाही,’ असं तिने सांगितलं.

हेमांगीने तिच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा ताज हॉटेलमध्ये गेली. ताजमधील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच ताजमधला तिचा अनुभव कसा होता, हे सुद्धा तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले. हेमांगी कायम विविध विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं मांडत असते.

हेमांगीने अनेक चित्रपटांत काम केले असून अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये पण तिने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी हेमांगी कायम विविध मुद्द्यांवर आपले मत मांडत असते. अनेक ठिकाणी आलेले अनुभव सांगत असते. त्यामुळे कधी कधी ती ट्रोल देखील होते. मात्र मध्यंतरी स्वतः हेमांगीने आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, असे सर्वांना ठणकावून सांगणारी पोस्ट शेअर केली होती. आता ताजबद्दलच्या भन्नाट अनुभवाची ही नवी पोस्ट तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते आहे.

महत्वाच्या बातम्या-
Bilquis Bano case : बिल्कीस प्रकरणातील आरोपींचे कारागृहातून सुटल्यानंतरचे वर्तन अत्यंत घृणास्पद; न्यायमुर्ती भडकले
दारू पिऊन महिलेचा बसमध्ये धिंगाणा; पोलिसांनाही आवरेना, व्हिडीओ व्हायरल
किर्तनकार शिवलीला पाटील यांनी दिली गुड न्युज; घरी एकाचवेळी दोन फॅमिली मेंबरचे आगमन

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now