Raigad : रायगड येथील श्रीवर्धनमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-४७ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका बोटीत २२५ राउंड्स गोळ्या असल्याचेही आढळून आले आहे.
पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. शस्त्रास्त्र असलेली बोट आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्रकिनारी दोन संशयास्पद बोटी आढळल्या आहेत. यातील हरिहरेश्वर येथील बोटीत तीन एके-४७ आणि २२५ राउंड्स गोळ्या आढळल्या आहेत. तसेच भरडखोल येथील बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहे.
सकाळी आठ वाजताच्या सुमारास काही स्थानिकांना समुद्रात बोट अडकली असल्याचे दिसले. या बोटीमध्ये रायफल आणि बुलेट्स आढळून आल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला. ही स्पीड बोट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याआधी मुंबईत २६/११ ला हल्ला झाला होता. या हल्ल्यातील दहशतवादी समुद्राच्या मार्गाने आले होते. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे जीवही गेले होते. त्यांनतर आता आणखी अशा प्रकारची बोट आढळून आल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच यासंबंधी तपास सुरु आहे. ही बोट बेवारस असून यासंबंधी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
RTO : RTO अधिकाऱ्याच्या घरी सापडला खजिना, पगारापेक्षा ३ पट संपत्ती, आकडा वाचून हादराल
Ajeet Pavar: आपण एकत्र काम केलं आहे, मध्ये बोलायचं नाही; अजितदादांनी शंभूराज देसाईंची केली बोलती बंद
Twins : आईच्या डोळ्यांसमोर दोन जुळ्या मुलांनी सोडला जीव, मग प्रशासनाला आली जाग, वाचून हादराल
शिवसेनेची गळती सुरूच, नागपूरातून मोठा धक्का देत ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर