Kerala : लैंगिक छळाच्या गुन्ह्याबाबत केरळमधील कोर्टाने एक हैराण करणारा निर्णय दिला आहे. एका ७४ वर्षीय व्यक्तीवर केरळमधील एका महिलेने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, महिलेचे कपडे उत्तेजित करणारे असल्याने लैंगिक छळाचा गुन्हा होऊ शकत नसल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
केरळमधील सिविक चंद्रन हे एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे वय ७४ वर्ष आहे. त्यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. जामीन मिळावा म्हणून याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यावेळी आरोपी सिविक चंद्रन यांच्यावतीने सादर करण्यात आलेले पुरावे व फोटो तपासण्यात आले. यात तक्रारदार पीडित महिलेने स्वतः उत्तेजित करणारे कपडे परिधान केले असल्याचे दिसून आले. त्यामुळे या पुराव्यानुसार आरोपीवर ३५४अ कलम लागू होणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
केरळमधील कोझिकोड कोर्टातील हे प्रकरण आहे. येथील एका महिलेने एका व्यक्तीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, कोर्टाने या प्रकरणावर महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत लैंगिक छळाचा संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीला दिलासा मिळाला आहे.
यासोबतच ७४ वर्षीय आरोपीच्या वयाबाबतदेखील कोर्टाने महत्त्वाचे विधान केले आहे. वय वर्ष ७४ असलेली ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे. या व्यक्तीने पीडित महिलेला जबरदस्तीने आपल्या मांडीवर बसवणे, ही गोष्ट अशक्य आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही, असेदेखील यावेळी कोर्टाने म्हटले आहे.
तक्रार करणाऱ्या महिलेने उत्तेजित करणारे कपडे घातले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर व्यक्तीवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. कोझिकोड सत्र न्यायालयातील या सुनावणीदरम्यान कोर्टाने नोंदवलेले मत सध्या चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : अधिवेशन काळात ‘या’ मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गट येणार अडचणीत; सरकारचीही सत्वपरीक्षा
स्वातंत्र्यदिनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Santosh Bangar : कंत्राटदाराला मारल्यांनंतर आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला….
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा






