Share

Shivam Sharma : आईच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध बनवल्यानंतर घरच्यांनी दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया, अभिनेत्याचा खुलासा

Shivam-Sharma

(Shivam Sharma) : टीव्ही अभिनेता शिवम शर्मा या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ओटीटी रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मध्ये दिसला होता. हा शो कंगना राणौतने होस्ट केला होता आणि त्यात शिवमने अनेक खुलासे केले होते. शोमध्ये शिवमने सांगितले की, त्याचे एकदा त्याच्या आईच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध होते.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवमने सांगितले की, जेव्हा त्याच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? शिवमने सांगितले की, ‘हा एपिसोड प्रसारित होताच माझे म्हणणे ऐकून माझ्या संपूर्ण कुटुंबाने ती महिला कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

मी आईच्या सगळ्या मैत्रिणींना आई म्हणायचो. सगळे मिळून हिशोब करत होते की ही १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मग आपण तेव्हा कुठे राहत होतो आणि मी कोणत्या आईच्या मैत्रिणीबद्दल बोलतोय. माझ्या पालकांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ते मला कधीच काहीच बोलत नाही, आजपर्यंत त्यांनी मला नेहमीच साथ दिली आहे. शिवमने शोमध्ये सांगितले होते की त्याच्या शेजारी राहणारी एक काकू त्याच्या आईची चांगली मैत्रीण होती. शिवम स्वत: अभिनयासोबतच खूप चांगला स्वयंपाकही करतो, त्यामुळे तो तिच्यासाठी पास्ता घेत असे आणि या बहाण्याने तीच्यासोबत वेळ घालवत असे.

शिवमने सांगितले होते की त्या काकूचा घटस्फोट झाला आहे आणि शिवम तिला लैंगिक समाधानासाठी मदत करू इच्छित होता. या मुलाखतीत शिवमने इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आपल्या तीन पिढ्यांनी अभिनेता होण्यासाठी खूप मेहनत केली आहे, पण अभिनेता म्हणून त्याने आपला ठसा उमटवला असल्याचे त्याने सांगितले.

शोबद्दल बोलताना शिवम म्हणाला, ‘हा शो न जिंकल्याबद्दल क्षमस्व. माझी फसवणूक झाली. मित्रांनी साथ दिली नाही. मुन्नावरचे मतदान खूप जास्त होते, त्यामुळे मला वाटते की त्याने चार्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

महत्वाच्या बातम्या
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा
म्हातारपणाची अवस्था सांगताना रतन टाटा भावूक झाले; म्हणाले, एकटं राहणं काय…
आम्ही सरकार चालवत नाही, पुढचे ७/८ महीने कसेतरी सांभाळायचेत; भाजप मंत्र्याची ऑडीओ क्लिप व्हायरल

ताज्या बातम्या इतर क्राईम बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now