Sanjay Raut : तुरूंगात संजय राऊत दिवसभरात बराच वेळ करतात ‘हे’ काम, हाती असते वही अन् पेन

Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. ते सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत. अर्थर रोड तुरुंगातील कोठडी नंबर ८९५९ मध्ये संजय राऊत यांना ठेवण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणामुळे संजय राऊत यांना वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी त्यांना टीव्ही, कॅरम, पुस्तके आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या आहेत. त्यांनी मागणी केल्यामुळे तुरुंग प्रशासनाकडून त्यांना वह्या आणि पेनही देण्यात आले आहे.

यासोबतच संजय राऊत यांना तुरुंगातील ग्रंथालयाकडून वाचण्यासाठी पुस्तके देण्यात येत आहे. याठिकाणी संजय राऊत काहीतरी लिहीत आहे. परंतु ते तुरुंगात जे काही लिखाण करत आहेत ते तुरुंगाच्या आतमध्येच राहणार आहे.

संजय राऊत यांना ८ ऑगस्ट रोजी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून २२ ऑगस्टपर्यंत ही कोठडी कायम राहणार आहे. संजय राऊत अर्थर रोड तुरुंगात ग्रंथालयातील वर्तमानपत्र आणि पुस्तके वाचत असतात. तसेच दिवसभरातील बराच वेळ ते लिखाणात व्यस्त असतात.

संजय राऊत यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नवाब मलिक व अनिल देशमुख हे दोन नेतेदेखील अर्थर रोड तुरुंगातच आहेत. नवाब मलिक यांना दाऊद इब्राहीमशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे सध्या कुर्ल्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांवरून अटक करण्यात आली होती. जवळपास गेल्या ९ महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. दरम्यान, या तिन्ही नेत्यांना तुरुंगात वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तरीही राजन विचारे मध्यरात्री शिवसैनिकांसह होते उपस्थित
मोदी-शहांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंच नव्हतं, एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
करीना कपूरने लाल सिंग चड्ढा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसमोर जोडले हात; म्हणाली, कृपा करून… 
‘आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलायचं’, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय