Share

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच दिलं इंग्रजीत भाषण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Eknath Shinde

Eknath Shinde : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईमध्ये या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीमध्ये भाषण केले. या भाषणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

https://www.facebook.com/mieknathshinde/videos/628696128598831/

या कार्यक्रमामध्ये भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीमध्ये आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनतर मराठीत थोडं बोललं तर चालेल ना? असे विचारत ते पुढे मराठीत बोलले. नंतर पुन्हा त्यांनी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली.

“आझादी का अमृत महोत्सवामुळे खरोखरंच या देशामध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची मोठी लाट आलेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आज संपूर्ण देश हर घर तिरंगा या मोहिमेमुळे जात, धर्म, भाषा विसरून एक झाल्याचं एक चांगलं चित्र आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे,” असे एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

याप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीनेही आवाहन करण्यात आले. सर्व मुंबईकरांनी घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी व्हावे. आपल्या घरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने, अशा योग्य स्थितीत फडकवावा. तसेच अभियान कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी केले.

हर घर तिरंगा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे ४ लाख राष्ट्रध्वज खरेदी केले. तर टाटा समूहाने १ लाख राष्ट्रध्वज महानगरपालिकेला दिले. प्रशासनाने हे सर्व राष्ट्रध्वज तिरंगा मुंबईतील घरोघरी पोहोचविण्याचे काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळाच्या यादीत नाव न आल्याने संजय शिरसाट नाराज? म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माझे नाव…
‘ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करणार’; भाजप नेत्याने केली गर्जना
शिंदे गटातील ‘या’ बड्या आमदाराने उद्धव ठाकरेंना म्हटले कुटुंबप्रमुख; परत येण्याचे दिले संकेत?
Uddhav Thackeray : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आखला ‘हा’ मास्टर प्लॅन; माजी नगरसेवकांची भेट घेऊन म्हणाले…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now