बलात्कार (Rape Case): उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील वयाच्या १२ व्या वर्षी सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या महिलेला २८ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. १२ वर्षाची असताना एका महिलेवर बलात्कार झाला होता. त्यानंतर आता २८ वर्षानंतर तिच्या मुलानेच तिला न्याय मिळवून दिला आहे.
पीडित महिला तिची बहीण व बहिणीच्या पतीसोबत राहत होती. बहीण व तिचे पती दोघे नोकरी करत होते. एक दिवस दोघेही घरी नसताना मोहल्ल्यातील नकी हसन याने घरात घुसून पीडितेवर अत्याचार केला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ गुड्डू यानेही तिच्यावर अत्याचार केला. यामुळे ती गर्भवती राहिली व यातून १९९४ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला.
हे मूल तिने हरदोई येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला दत्तक दिले. पुढे महिलेचे गाझीपूर येथील एका व्यक्तीशी लग्न झाले. काही काळानंतर पीडितेच्या पतीला तिच्या भुतकाळाबद्दल कळल्यावर त्याने तिच्याशी संबंध तोडले. त्यानंतर ती लखनऊ येथे येऊन राहू लागली.
२७ वर्षानंतर पीडितेच्या दत्तक दिलेल्या मुलाने त्याच्या खऱ्या आईबद्दल माहिती काढली. त्यानंतर तिचा शोध घेऊन त्याने तिची भेट घेतली. तेव्हा त्याला त्याच्या आईसोबत घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाली.
२७ वर्षानंतर त्याला आपल्या वडिलांचे हे कृत्य समजले. मुलाने आईला पोलिसात तक्रार करण्याची हिम्मत दिली. पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी केली, त्यानंतर आरोपी गुड्डूची डीएनए चाचणी पॉझिटिव्ह आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गुड्डूचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यानंतर आता कायद्यानुसार त्याला शिक्षा मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena: ज्या पक्षातून निवडूण आला त्यालाच बाजूला टाकणे हा तर लोकशाहीला धोका; सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला सुनावले
Uddhav Thackeray: ‘तानाजी सावंत हा पैशाने माजलेला बोकड, त्याला पैशाची मस्ती, याला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाही’
Sunroof: अल्टो आणि वॅगनरमध्येही बसवता येणार सनरूफ; कमी किंमतीत घ्या आलिशान गाड्यांच्या सुविधांचा आनंद
Shivsena: ‘वेळ आल्यावर गाड्याच नाही तर तोंडही फोडू, तोंडाला काळे फासू’; गद्दारांविरोधात शिवसैनिक आक्रमक