wedding anniversary: लग्नाच्या वाढदिवसादिवशीच हरवली पत्नी, शोधायला पतीने खर्च केले 1 कोटी, नंतर झाला मोठा खुलासा

लग्नाच्या वाढदिवस (wedding anniversary): आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या बेपत्ता पत्नीचा शोध घेण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्च केली. गोताखोर, नौदल, सागरी पोलीस, हेलिकॉप्टरनेही तिचा शोध घेतला, पण पत्नी सापडल्यावर पायाखालची जमीनच सरकली.(Wedding Anniversary, Andhra Pradesh, Visakhapatnam, Wife, Husband)

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या शोध मोहिमेत पतीने सुमारे एक कोटी रुपये खर्च केले. पण जेव्हा पत्नी भेटली तेव्हा ती तिच्या प्रियकरासोबत होती. यानंतर पतीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला सरप्राईज द्यायचे होते.

तो पत्नीसह विशाखापट्टणमला आला होता. यानंतर दोघे बीचवर गेले तेथे जाऊन त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं. नवऱ्याच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला आणि तो बोलण्यात गुंग झाला. यादरम्यान पत्नीने फोनवरून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे बोलणे संपवून तो मागे वळला तेव्हा त्याची पत्नी तिथून गायब होती.

पत्नीची खूप शोधाशोध केल्यानंतर ती पाण्यामध्येच बुडाली असावी, असे पतीला वाटले. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याने नौदल, सागरी पोलीस, गोताखोर आणि मच्छिमारांची मदत घेतली. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च आला. बरीच शोधाशोध करूनही पत्नी न सापडल्याने पती निराश झाला.

मात्र, नंतर ती नेल्लोरमध्ये सापडली. जेव्हा तो पत्नीला घेण्यासाठी पोहोचला तेव्हा ती त्याच्या प्रियकरासोबत होती. हे पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी थ्री टाउन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कुटुंबीयांनाही कळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
पत्नीपासून वेगळे होणे सहन झाले नाही, अनिल कपूर यांनी शेअर केली ही पोस्ट, म्हणाले, ४८ वर्षांत..
काय सांगता? दुसऱ्यांदा सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात; या कारणामुळे घेतला मोठा निर्णय
रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस, सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, पहा फोटो