गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरावर(Mundra Port) छापेमारी केली आहे. या छापेमारीत एका कंटेनरमध्ये तब्बल ३७५ कोटींचे हेरॉइन आढळून आले आहे. पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने ७५.३ किलो हेरॉइन जप्त केले आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.(Heroin worth 375 crore found in Adani group’s Mundra port)
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मुंद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत मुंद्रा बंदरावर छापेमारी केली. यावेळी पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाला एका कंटेनरमध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या.
पोलिसांनी शोध घेतला असता या कंटेनरमध्ये तब्बल ७५.३ किलो हेरॉइन आढळून आले. हे हेरॉइन लपवण्यासाठी कार्डबोर्ड पाइपचा वापर करण्यात आला होता. निळ्या रंगाच्या प्लास्टिकचा वापर करून हे हेरॉइन लपवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ गुजरातमधून पंजाबला पाठवण्यात येणार होते.
यापूर्वी देखील पोलिसांनी गुजरातमधील अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरावरून अंमली पदार्थ जप्त केले होते. १५ सप्टेंबर २०२१ रोजी अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरावर गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत अनेक कंटेनरमध्ये अंमली पदार्थ आढळून आले होते. पोलिसांनी या छापेमारीत तब्बल तीन हजार किलो अंमली पदार्थ जप्त केले होते.
२४ मे २०२२ रोजी देखील अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनाकडून छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत तब्बल ५२ किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात किंमत ५०० कोटींहून अधिक होती. हे कोकेन इराणच्या मुंद्रा बंदरातून भारतात आणण्यात आले होते.
महसूल गुप्तचर संचालनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमधून आयात केल्या जाणाऱ्या काही मालामध्ये ड्रग्ज असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी महसूल गुप्तचर विभागाने‘ऑपरेशन नमकीन’ सुरू केले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
खेळाडू म्हणून शेतमजूर, बनावट अंपायर अन् शेतातील मैदान, खोटी IPL स्पर्धा भरवून सट्टेबाजांना लाखोंचा चुना
हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी…, बड्या नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल
बंडखोरांना काय तो दांडा, काय ते ढुं.. म्हणणाऱ्या नगरसेविकाच शिंदे गटात सामील, कारणही सांगितलं