एका राजकीय नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला रडत-रडत श्रीकांत देशमुख(Shrikant Deshmukh) यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत असल्याचे दिसत आहे.(BJP shrikant deshmukh video viral on social media)
या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला कॅमेऱ्यासमोर रडताना दिसत आहे. या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र देखील आहे. त्यानंतर ही महिला कॅमेरा फिरवते. त्यावेळी एक व्यक्ती बनियनवर आलिशान बेडवर बसलेला दिसतो. त्यावेळी ती महिला म्हणते की, “हा जो माणूस आहे.”
“या माणसाने मला फसवलं आहे. हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा”, असे त्या महिलेने व्हायरल व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये सांगितले. त्यानंतर बेडवर बसलेला व्यक्ती उठतो आणि कॅमेरा बंद करण्यासाठी प्रयत्न करू लागतो. यावेळी त्या व्यक्तीमध्ये आणि त्या महिलेमध्ये झटापट होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पुढे म्हणते की, “नाही. आता तू बघच…तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलता? यानंतर कॅमेरा बंद होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
https://twitter.com/AjaySakat14/status/1546828031536156672?s=20&t=zVDg4BFInxVIYUQI5xsjPQ
यामुळे श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळत आहे. श्रीकांत देशमुख यांना भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद तात्पुरत्या स्वरूपात पदभार विक्रम देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रीकांत देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या व्हिडिओची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुलाला गिळल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मगरीसोबत केलं हे भयानक कृत्य, व्हिडिओ आला समोर
ठाकरेंना आव्हान देण्यासाठी संतोष बांगर करत होते शक्तीप्रदर्शन, शिवसैनिकांनी दिला दणका
VIDEO: टोल प्लाझावर कर्मचारी ग्रेट खलीला म्हणाले ‘माकड’, दोघांमध्ये झाली हाणामारी