एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(amruta fadanvis talk about next project in interview)
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या गुप्त भेटींबाबत देखील मोठा खुलासा केला होता. त्यावेळी अमृता फडणवीस खूप चर्चेत आल्या होता.
आता एका मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात माहिती दिली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अमृता फडणवीस यांचे एक गाणे रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांचे कोणतेही नवीन गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण आता पुढील काही महिन्यांमध्ये २ ते ३ नवीन गाणी प्रदर्शित होणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.
अमृता फडणवीस या मुलाखतीत म्हणाल्या की, “पुढील काही महिन्यांमध्ये माझी काही नवीन गाणी प्रदर्शित होणार आहेत. मी रेकॉर्ड केलेली आणि शूट केलेली २- ३ गाणी तयार आहेत. खरं तर याच महिन्यातच ती गाणी रिलीज होणार होती. पण काही कारणास्तव आता पुढच्या दोन-तीन महिन्यात आधी २ गाणी येतील. त्यानंतर आणखी काही गाणी येणार आहेत”, असे अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या गुप्त भेटींबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी रात्री वेशांतर करून बाहेर पडायचे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना ओळखणे देखील कठीण असायचे, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत दिली होती.
“देवेंद्रजी रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे माझ्या फार लक्षात आले नाही. पण कधी कधी ते रात्री उशिरा वेशांतर करून बाहेर पडायचे. यावेळी मलाही त्यांना ओळखणे कठीण जायचे. मी त्यांना यासंदर्भात विचारलं की ते विषय टाळायचे. मात्र काही ना काही चाललंय, याची मला कल्पना आली होती”, असे अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
धक्कादायक! अटक टाळण्यासाठी चोराने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यु
शमितासोबत ब्रेकअपच्या बातम्यांवर संतापला राकेश बापट, म्हणाला, या गोष्टी आपण बदलू शकतो का?
खुनाच्या आरोपातून झाली निर्दोष मुक्तता, भाजप नेत्यानी काढली 70 किलोमीटरची मिरवणूक