मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अटक करण्याच्या भीतीने एका चोराने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली आहे. या दुर्घटनेत चोराचा(Thief) मृत्यू झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव रोहित आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.(The thief jumped from the fourth floor to avoid arrest, died during treatment)
मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह परिसरातील जयंत महल सोसायटीमध्ये पहाटे चारच्या सुमारास एक चोर घुसला होता. गेटवरील वॉचमनला सोसायटीमध्ये चोर घुसल्याच्या संशय आला. त्यामुळे वॉचमनने अलार्म वाजवत सोसायटीमधील लोकांना चोर घुसल्याची माहिती दिली. काही वेळानंतर सोसायटीमधील लोकांनी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.
सोसायटीमध्ये चोर घुसल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. सोसायटीमध्ये पोलीस आल्याचे पाहताच चोर ड्रेनेज पाइपचा वापर करत इमारतीवर चढला आणि चौथ्या मजल्यावरील एका खिडकीच्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्यानंतर पोलिसांनी त्या चोराला खाली उतरण्याचे आवाहन केले. पण चोराने नकार दिला.
त्यानंतर चोराची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्या चोराला अटक करणार नसल्याचे देखील सांगितले. पण तरीही चोराने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून सुरक्षा रक्षक जाळी धरली आणि त्यामध्ये चोराला उडी मारण्यास सांगितले.
सोसायटीमधील काही रहिवाशांनी त्या चोराला नजीकच्या खिडकीतून घरात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही वेळाने एका पोलीस कर्मचाऱ्याने सेफ्टी बेल्टचा वापर केला आणि धाडस करत चौथ्या मजल्यावर त्या चोराजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस जवळ येताच त्या चोराने शेजारी असलेल्या इमारतीच्या जागेत उडी मारली.
या दुर्घटनेत चोराला गंभीर दुखापत झाली होती. त्या चोराला तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या चोराला हिंदी आणि बंगाली या दोन भाषा येत होत्या. पोलिसांकडून सध्या मृत पावलेल्या चोराच्या कुटूंबियांचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकमध्ये दिसणार ‘हे’ कलाकार, करण जोहरने स्वताच केला खुलासा
करण जोहरने चुकून उघड केले आलिया-रणबीरच्या मुलाशी संबंधित ‘ते’ रहस्य, म्हणाला…
विश्वासदर्शक ठरावासाठी काँग्रेसचे ९ आमदार होते गैरहजर, हायकमांडने केली ‘ही’ कारवाई