‘कॉफी विथ करण’ या रिऍलिटी टॉक शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॉफी विथ करण’ या रिऍलिटी टॉक शोमध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतात. या शोमध्ये करण जोहर बॉलीवूड कलाकारांना वेगवेगळे प्रश्न विचारतो. या प्रश्नांवर बॉलीवूड कलाकार मजेशीर उत्तरे देतात.(Imran Hashmi expressed desire in Coffee with Karan, said, I am with Deepika …)
आतापर्यंत ‘कॉफी विथ करण’ या रिऍलिटी टॉक शोचे सहा सीझन झाले आहेत. ‘कॉफी विथ करण’ या रिऍलिटी टॉक शोच्या चौथ्या सीझनच्या एपिसोडमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने(Imran Hashmi) हजेरी लावली होती. यावेळी इमरान हाश्मीसोबत दिग्दर्शक महेश भट्ट देखील उपस्थित होते. या एपिसोडमध्ये करण जोहरच्या प्रश्नांना अभिनेता इमरान हाश्मीने मजेशीर उत्तरे दिली आहेत.
या एपिसोडमध्ये करण जोहरने अभिनेता इमरान हाश्मीला किसींग सीनच्या संदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अभिनेता इमरान हाश्मी म्हणाला की, “माझा सर्वात आवडता किसींग सीनअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत होता. तसेच सर्वात वाईट किसींग सीन अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत होता”, असे अभिनेता इमरान हाश्मीने ‘कॉफी विथ करण’ च्या एपिसोडमध्ये सांगितले.
यानंतर करण जोहरने अभिनेता इमरान हाश्मीला कोणत्या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन द्यायला आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अभिनेता इमरान हाश्मी म्हणाला की, “मला अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत इंटिमेट सीन द्यायला आवडेल”, असे सांगितले. या उत्तराने करण जोहर आश्चर्यचकित झाला.
यानंतर करण जोहरने अभिनेता इमरान हाश्मीला अभिषेक बच्चन आणि सैफ अली खान यांच्याकडून कोणती गोष्ट चोरायला आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अभिनेता इमरान हाश्मी म्हणाला की, “मला अभिषेक बच्चनकडून त्याची पत्नी ऐश्वर्या बच्चन चोरायला आवडेल आणि सैफ अली खानकडून त्याची पत्नी करीना कपूर चोरायला आवडेल”, असे अभिनेता इमरान हाश्मीने सांगितले.
काही महिन्यांपूर्वी अभिनेता इमरान हाश्मीचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली होती. अभिनेता इमरान हाश्मी ‘टायगर 3’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ‘सेल्फी’ या चित्रपटात इमरान हाश्मी अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मला दिपीकासोबत ‘तसे’ सीन्स करायचेत, इमरान हाश्मीच्या वक्तव्याने सगळेच हैराण
उद्धव ठाकरेंचे ‘ते’ वक्तव्य झोंबले! ३० वर्षे साथ देणाऱ्या नेत्याने शिवसेना सोडून मनसेत केला प्रवेश
संजय राऊतांना शिवडी कोर्टाचा दणका, ‘त्या’ प्रकरणात अटक वॉरंट जारी