टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. टीम इंडियाचा सध्या इंग्लंडसोबत पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऋषभ पंतने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांना चोपले आहे. या सामन्यात ऋषभ पंतने शतक ठोकले आहे. ऋषभ पंतने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा देखील विक्रम मोडला आहे.(rishab pant score 100 in 23 balls)
इंग्लड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरवात चांगली झाली नाही. टीम इंडियाची अवस्था ५ बाद ९८ धावा अशी झाली होती. त्यावेळी ऋषभ पंत मैदानावर आला. मैदानावर येताच ऋषभ पंतने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरवात केली. ऋषभ पंतने इंग्लंडचे स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स आणि जेम्स अँडरसन या अनुभवी गोलंदाजांना धु- धु धुतले.
यावेळी टीम इंडियाचा डावखुरा अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजा याने ऋषभ पंतला चांगली साथ दिली. रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी मिळून २२२ धावांची भागीदारी केली आहे. या सामन्यात ऋषभ पंत झंझावाती खेळी करत केवळ ८९ चेंडूत शतक ठोकले आहे. यामध्ये १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
या सामन्यात रवींद्र जडेजाने देखील अर्धशतक केले आहे. त्याने १६३ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावा केल्या आहेत. या सामन्यात ऋषभ पंतने अनेक विक्रम केले आहेत. या सामन्यात ऋषभ पंतने सर्वात कमी वयात १०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच २००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या यष्टिरक्षकाचा विक्रम देखील ऋषभ पंतने स्वतःच्या नावावर केला आहे.
आतापर्यंत इंग्लंडमध्ये विरोधी संघातील कोणत्याही यष्टिरक्षकाने दोन शतके झळकावली नव्हती. पण टीम इंडियाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने हा विक्रम केला आहे. या सामन्यात ऋषभ पंतने सचिन तेंडुलकरचा देखील विक्रम मोडला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने आणि विराट कोहलीने एडिबस्टन या ठिकाणी शतक ठोकले आहे.
आता ऋषभ पंतने एडिबस्टन या ठिकाणी शतक ठोकले आहे. ऋषभ पंतने या सामन्यात १४६ धावा केल्या आहेत आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ७ बाद ३३८ धावा केल्या होत्या. महेंद्रसिंग धोनीने २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ९३ चेंडूत शतक ठोकले होते. पण ऋषभ पंतने केवळ ८३ चेंडूत शतक केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
एका रात्रीत ट्रक ड्रायव्हर झाला करोडपती, मिळाले 7.1 कोटी; म्हणाला, मला मोबाईलवर मेसेज आला अन्..
‘पुन्हा असं व्हायला नको’, बंडखोर आमदारांवर मुख्यमंत्री शिंदे भडकले; कारणही आले समोर
PHOTO: मर्यादेपेक्षा बोल्ड ड्रेस घालून ट्रेलर लॉन्चला पोहोचली दिशा, फिगर पाहून चाहते झाले थक्क