एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंड केले होते. यामुळे शिवसेनेमध्ये मोठी फुट पडली होती. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे.(shivsnea office holder give resigntaion because of aadesh bandekar)
एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सरचिटणीस अमोल परब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी अमोल परब यांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अमोल परब यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे शिवसेनेत उभी फुट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर पदाधिकारी नाराज असल्याचे अमोल परब यांनी सांगितले आहे. शिवसेनेत कार्यकर्त्यांचा अपमान केला जातो, असे देखील अमोल परब यांनी सांगितले आहे.
आदेश बांदेकर यांच्यावर आरोप करताना अमोल परब यांनी पत्रात लिहिले की, “मी वरळीत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं आणि त्यांचे पोस्टर लावले होते. त्यामुळे मला आपल्याच पक्षाचे लोक गद्दार बोलले. मी आज माझ्या सदस्य आणि माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे”, असे अमोल परब यांनी पत्राच्या माध्यमातून म्हंटले आहे.
अमोल परब यांनी पत्रात पुढे लिहिले की, “मी हा राजीनामा देतो कारण…मी मागील ८ वर्षांपासून एक कार्यकर्ता आहे. पण मला कधीही काम करू दिलं नाही. ही व्यथा प्रत्येक शिवसेना चित्रपट सेनेच्या सदस्याची आहे. ३ वर्षात चित्रपट सेनेची साधी मिटींग झाली नाही. ४ वर्षात चित्रपट सेनेने काहीही काम केलं नाही. चित्रपट सेनेचा कोणताही अजेंडा नाही”, असे अमोल परब यांनी पत्राच्या माध्यमातून म्हंटले आहे.
अमोल परब यांनी पत्रात पुढे लिहिले की, “आपले चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना साडी वाटण्यापासून फुरसत मिळत नाही, ते काय काम करणार. त्यांना किती जबाबदाऱ्या दिल्या आहेत. सिद्धिविनायक मंदिर, अंधेरी स्पोर्ट क्लब एवढ्या जबाबदाऱ्या दिल्यानंतर आदेश बांदेकर यांचं लक्ष चित्रपट सेनेवर कसं राहणार.”
“जर त्यांना काम करायचं नव्हतं तर त्यांना आमच्या डोक्यावर का बसवलत उद्धव साहेब…”, असा प्रश्न अमोल परब यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे नेते इतर पक्षांच्या लोकांची कामे करतात, पण आमची कामे करत नाहीत, असे देखील अमोल परब यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितले आहे. या पत्राची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, अन् माझे आई वडील..; मुलीच्या गंभीर आरोपांनी खळबळ
बुमराहने युवराज सिंग स्टाईलने एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 35 धावा, केला ऐतिहासिक विक्रम
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का