सैल कपडे, नो मेकअप लूक आणि बरंच काही… ; पहा गरोदर आलिया भट्टचे Unseen फोटो

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली होती. अभिनेत्री आलिया भट्टने सोनोग्राफी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनेत्री आलिया भट्टला(Alia Bhatt) शुभेच्छा दिल्या होत्या.(See Unseen photos of pregnant Alia Bhatt)

आता अभिनेत्री आलिया भट्टचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट सैल कपड्यांमध्ये दिसत आहे. तसेच या फोटोंमध्ये अभिनेत्री आलिया भट्टच्या चेहऱ्यावर मेकअप देखील दिसत नाही. या फोटोमध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत एक लहान मुलगी देखील दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे. यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट लंडनमध्ये आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट्ट जेवण करण्यासाठी एक रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी व्हायरल होत असलेला हा फोटो काढण्यात आला आहे. यापूर्वी कपूर फॅमिलीच्या गेट-टूगेदरचे फोटो देखील समोर आले होते.

या फोटोमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट तिची बहीण शाहीनसोबत दिसत आहे. यासोबत फोटोमध्ये अरमान जैन, त्याची पत्नी अनिसा मल्होत्रा, भाची नताशा नंदा एकत्र बसलेले दिसत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने आई होणार असल्याचे सोशल मीडियावर सांगितल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा कपूरने शुभेच्छा दिल्या होत्या.

रिद्धीमा कपूरने अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा एकत्र असलेला एक फोटो सोशल मीडियावर स्टोरीवर शेअर केला होता. माझ्या बाळांना बाळ होणार आहे…”, असे रिद्धीमा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले होते. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने देखील अभिनेत्री आलिया भट्ट शुभेच्छा दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :-
अद्भूत! तब्बल ६० वर्षांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडला चमत्कार, फोटो पाहून थक्क व्हाल
तुझ्या घरासमोर २०० बिहारी उभे करेल, चाकू खूपसून तुला मारून टाकेल; अभिनेत्रीला नोकराची धमकी
एकनाथ शिंदेंनी स्वतः रिक्षा चालवत दंगलीत वाचवला होता चिमुरड्याचा जीव, वाचा ‘तो’ थरारक किस्सा