Share

पुरुषांच्या ‘या’ पाच वाईट सवयींमुळे कमी होतो sperm count ! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

व्यक्तीचे वय वाढत गेल्यास त्याची प्रजनन क्षमता कमी होत जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्या लोकांचे वय ३० ते ४० दरम्यान आहे. त्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण आजकाल या वयोगटातील(Age) लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीचे वय ४० वर्षांचे झाले तर त्या व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.(Men’s ‘these’ five bad habits reduce sperm count! Know the information provided by experts)

जर एखादी स्त्री गर्भधारणा करू शकत नसेल, तर अशा प्रकरणांमध्ये ५० टक्के पुरुषांमध्ये आरोग्याच्या समस्या असल्याचे कारण समोर आले आहे. अनेक कारणांमुळे पुरुषांमध्ये प्रजनन दर कमी होऊ शकतो. आहार, लठ्ठपणा, मानसिक ताण आणि धूम्रपान अशा काही समस्यांचा व्यक्तीच्या प्रजनन दरावर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांमधील ‘या’ पाच वाईट सवयींमुळे त्यांच्या प्रजनन दरावर परिणाम होतो. त्यातील पहिली वाईट सवय म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान आहे. धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे पुरुषांमधील वीर्याची गुणवत्ता कमी होते. तसेच धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे शुक्राणूंवर देखील परिणाम होतो. शुक्राणूंची उत्पादन क्षमता कमी होते.

दुसरी वाईट सवय म्हणजे लठ्ठपणा. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य पुरुषांच्या तुलनेमध्ये लठ्ठ पुरुषांमध्ये वीर्याची गुणवत्ता कमी असते. तसेच लठ्ठ पुरुषांमध्ये शुक्राणूचा डीएनएवर परिणाम झालेला असतो. लठ्ठ पुरुषांमध्ये शुक्राणूचा डीएनए जास्त खराब झालेला असतो. याचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन दरावर होतो.

तिसरी वाईट सवय म्हणजे तणाव. तणावाचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. तणावामुळे आपल्या शरीरातील टेस्टास्टेरॉनवर परिणाम होतो. टेस्टास्टेरॉनवर परिणाम झाल्यामुळे शुक्राणूचा दर कमी होतो. चौथी वाईट सवय म्हणजे अतिरिक्त औषधांचा वापर. सध्याच्या काळात अनेकजण तब्येत वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात.

या औषधांमुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. औषधांचा अतिरिक्त वापर केल्यास शुक्राणूंची उत्पादन क्षमता कमी होऊ शकते. त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या प्रजनन दरावर होऊ शकतो. पाचवी वाईट सवय म्हणजे बैठी जीवनशैली. बैठी जीवनशैलीमुळे शुक्राणूचा दर कमी होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. यामुळे पुरुषांच्या प्रजनन दरावर परिणाम होतो.

महत्वाच्या बातम्या :-
प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात केले दाखल; मुलाने दिली ‘ही’ महत्वाची अपडेट
सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड! फडणवीसांना दोन वेळा फोन; वाचा नेमकं काय घडलं
२९ वर्षीय आलिया भट्ट होणार आई, पण नक्की गर्भवती होण्याचं योग्य वय आहे किती? जाणून घ्या

ताज्या बातम्या आरोग्य राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now