Share

एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; ३८ आमदार जमवूनही स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Ekanth Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Eknath Shinde’s tension increased; An independent group cannot be formed even with 38 MLAs)

एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि या ४६ बंडखोर आमदारांना नवा गट स्थापन करता येणार नाही. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट निर्माण करता येणार नाही.

त्यांना दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीनीकरण करावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ३८ आमदार आहेत. याशिवाय आठ अपक्ष आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. एकनाथ शिंदे ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवीन गट स्थापन करणार आहेत. पण यामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कायद्यानुसार पक्षातील दोन तृतीयांश सदस्य फुटले तरच या आमदारांचे पद वाचू शकते. पण या आमदारांना स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या दोनच पर्याय आहेत. एकनाथ शिंदे यांना एकतर भाजपमध्ये किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करावा लागेल.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या कायद्यासंदर्भात बोलताना म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेतून बाहेर पडून नवीन गट स्थापन करता येणार नाही. पक्षांतर कायद्यानुसार भारतीय अनुसूची दहामधील तरतुदीनुसार त्या दोन तृतीयांश विधानसभा सदस्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल.”

“शिवसेनेत बंडखोरी करणारे काही सदस्य मूळ शिवसेना दावा करीत आहेत, पण तसे होऊ शकत नाही. २००३ पूर्वी स्वतंत्र गट करता येत होता. पण आता ते शक्य नाही”, असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या पुढे सध्या मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंचा अभ्यास कमी पडला; ३८ आमदार सोबत असूनही आली ‘ही’ वाईट वेळ
भगवान शंकराप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विष प्राषण केलंय; अमित शहा असं का म्हणाले? जाणून घ्या..
किशोर पेडणेकरांच्या ‘त्या’ धारधार प्रश्नावर बंडखोर गोगावलेंची बोलती बंद! फोनच कट केला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now