Share

उद्धव ठाकरे राजीनामा देणारच होते… पण इतक्यात त्यांना ‘या’ नेत्यांचे फोन आले; वाचा फेसबुक लाईव्हपूर्वी काय घडलं

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ४६ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे.(Uddhav Thackeray was about to resign but this four politician phone coming)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह संध्याकाळी पाच वाजता सुरु होणार होते. पण या फेसबुक लाईव्हला अर्धा तास उशीर झाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हला उशीर का झाला? याची चर्चा सध्या होत आहे. यामागचे कारण सध्या समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४६ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हाच निर्णय जनतेला सांगणार होते.

पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला होता. त्यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. ‘परिस्थिती कधीही बदलू शकते. तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका’, असा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्यास सांगितले. तसेच काँग्रेस नेते कमलनाथ यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला होता.

“उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका, महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे. काँग्रेसचा तुम्हाला पाठिंबा आहे”, असे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले होते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शिंदेंबद्दल महाराष्ट्रात द्वेष की प्रेम? कुठे हाय-हायच्या घोषणा तर कुठे समर्थनार्थ पोस्टरबाजी
वयाच्या ९१ व्या वर्षी चौथ्यांदा घटस्फोट घ्यायला निघालेत आजोबा, पत्नीला देणार ‘एवढ्या’ कोटींची पोडगी
‘या’ कारने भारतात गाडले यशाचे झेंडे, पार केला १ लाख कार्सच्या विक्रीचा टप्पा, वाचा किंमत अन् फिचर्स

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now