आईचं मंगळसुत्र विकून दंड भरायला आला तरूण, RTO ला समजताच उचललं ‘हे’ पाऊल, होतंय कौतुक

उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) महाराजगंज जिल्ह्यातील एका एआरटीओ अधिकाऱ्याचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी एका तरुणाने आईचं मंगळसूत्र विकलं होतं. या संदर्भातील माहिती मिळताच एआरटीओ अधिकारी आरसी भरती यांनी आपल्या पगारामधून या तरुणाच्या दंडाची रक्कम भरली आहे. (The young man pay the fine after selling mother’s Mangalsutra ARTO take this decision)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंज जिल्ह्यातील सिंगपूर तळी या गावातील राजकुमार हे ऑटो रिक्षा चालवतात. राजकुमार यांना एका डोळ्याने कमी दिसते. राजकुमार यांना सहा मुली आणि एक मुलगा आहे. राजकुमार यांच्या मुलाचे नाव विजय कुमार असे आहे. राजकुमार आपल्या कुटूंबाचा संपूर्ण खर्च रिक्षातून मिळणाऱ्या पैशांवर चालवतात.

राजकुमार यांच्या ऑटो रिक्षाचं चलन कापण्यात आलं होतं. या चलनाची रक्कम २४,५०० रुपये होती. राजकुमार यांचा मुलगा या चलनाची रक्कम भरण्यासाठी महाराजगंज जिल्ह्यातील सहाय्यक विभागीय परिवहन अधिकारी कार्यालयात गेला होता. पण त्याच्याकडे चलनाची पूर्ण रक्कम नव्हती. त्याच्याजवळ फक्त १२ हजार रुपये होते.

हे १२ हजार जमा करण्यासाठी विजयला त्याच्या आईचे मंगळसूत्र विकावे लागले होते. विजयकुमारचे सत्य माहित पडल्यानंतर एआरटीओ आरसी भारती यांनी त्याच्या चलनाची संपूर्ण रक्कम आपल्या पगारातून भरली आहे. यावेळी एआरटीओ आरसी भारती यांनी विजय कुमारला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच विजय कुमारला भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी एआरटीओ आरसी भारती यांनी विजय कुमारची विचारपूस देखील केली आहे. एआरटीओ आरसी भारती यांच्या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एआरटीओ आरसी भारती यांनी राजकुमार यांच्या ऑटो रिक्षाचा इन्शुरन्स देखील भरला आहे.

या घटनेची सध्या सर्व ठिकाणी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी एआरटीओ आरसी भारती यांचे कौतुक केले आहे. विजय कुमारच्या कुटूंबियांनी देखील दंडाची रक्कम भरण्यास मदत केल्यामुळे एआरटीओ आरसी भारती यांचे आभार मानले आहेत. सध्या या प्रकरणाची महारजगंज जिल्ह्यात चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मालकीण घरी नसताना मालक करायचा जबरदस्ती, कामवालीने सांगितली आपबिती, पोटासमोर इज्जत हारली
काय सांगता? उंदीरमामाने केली पोलिसांची मदत, १० तोळे सोने असलेल्या पिशवीचा ‘असा’ लागला शोध
“शरद पवार भारताचे राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल”