राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी काल औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी काही समर्थकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक देखील केली होती. (Munde supporters revolt over Pankaja munde not get vidhan parishad ticket)
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून सतत अन्याय केला जात आहे, अशी भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली होती. धक्कादायक बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांच्या एका कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता पिंपरी चिंचवड शहरात देखील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावेळी दत्ता कायंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका देखील केली आहे. “पिंपरी चिंचवड शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाय ठेवू देणार नाही. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या तोंडाला काळं फासू”, असा इशारा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी दिला आहे.
“लोकनेत्या पंकजा मुंडे यांना डावलल्यामुळे भाजपमध्ये बंड सुरु झाले आहे. पंकजा मुंडे यांना जाणूनबुजून विधान परिषदेसाठी डावलण्यात आलं आहे”, असे पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी सांगितले आहे. यावेळी दत्ता कायंदे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजप पक्ष ताब्यात घेऊन हुकूमशाही करत आहेत”, असा आरोप दत्ता कायंदे यांनी केला आहे. यावेळी पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दत्ता कायंदे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांचे पीए आमदार होतात. पंकजा मुंडे यांच्या जवळच्या लोकांना देखील संधी मिळते.”
“कालपर्यंत पंकजा मुंडे यांचे नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आघाडीवर होते. पण त्यांना संधी दिली जात नाही, याबद्दल आश्चर्य वाटते”, असे पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या टोळीला मुंडे परिवाराची ऍलर्जी आहे, असे देखील दत्ता कायंदे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
जर भारताने माफी मागितली नाही तर…’, पैगंबर अपमान प्रकरणी क्रिकेटर मोईन अलीची भारताला धमकी?
जेजुरीच्या खंडेरायाला भंडारा इतका प्रिय का आहे? यामागे आहे शंकराची पौराणिक कथा
सर्वात जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खोतांवर कोसळला दुखाचा डोंगर; म्हणाले, मला मिठीत घेणारी मिठीतून निघून गेली