Share

हिंदूंनी प्रत्येकवेळी गोळ्या खायच्या का? संरक्षण देता येत नसेल तर त्यांना बंदुका तरी द्या; मनसे आक्रमक

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. या घटनांमुळे काश्मिरी पंडित(Kashmiri Pandit) आणि इतर हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन करण्याची घोषणा केली आहे. आज मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित स्थलांतर करणार असल्याचे सांगितले जात आहे. (mns sandip deshpande tweet about hindu people murder in kashmir)

गेल्या २६ दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून १० नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनांमुळे भयभीत झालेले स्थानिक लोक आणि सरकारी कर्मचारी काश्मीर खोऱ्यातून पलायन करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये १९९० साली ज्याप्रमाणे घटना घडत होत्या, तशाच घटना आता पुन्हा घडत आहेत, असे पलायन करणाऱ्या स्थानिकांनी सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. काश्मीरमधील स्थितीवरून काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता महाराष्ट्रातील मनसे पक्षाने देखील जम्मू-काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारने हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, अशी मागणी केली आहे.

तसेच हिंदूंनी प्रत्येकवेळी गोळ्या खायच्या का? असा सवाल देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संरक्षण देता येत नसेल तर हिंदूंना बंदुका तरी द्या, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लिहिले की, “ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच बंदुका आणि ते चालवण्याच प्रशिक्षण केंद्र सरकारने दिलं पाहिजे”, असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1532563341088268288?s=20&t=IFu8c3WgDXWbsGSqTmHxQQ

काही दिवसांपूर्वी एका हिंदू बँक कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी ऑफिसमध्ये जाऊन गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर काल देखील अशीच एक घटना घडली आहे. एका हिंदू बँक मॅनेजरची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनांमुळे जम्मू काश्मीर खोऱ्यात राहणारे हिंदू भयभीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा दिल्लीत आज एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहेत. तसेच गृह मंत्रालय आणि लष्कराचे अधिकारी देखील या बैठकीला हजर राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
फडणवीसांनी मविआसमोर फासे टाकत चेंडू ठाकरे सरकारच्या कोर्टात टोलविला! ‘शब्द दिला, पण…’
ओम पुरीच्या पत्नीचे खळबळजनक आरोप, ‘केकेचा खूनच झालाय, CBI चौकशी व्हावी’
मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपुरमध्ये दंगल; नमाज पठणानंतर रस्त्यावरच राडा, तुफान दगडफेक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now