आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते.
आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या मेगा लिलावात अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास दाखवला नव्हता. तो आरसीबी संघाचा हुकुमी एक्का बनला आहे.
आयपीएल २०२२ मधील सुरुवातीच्या आठवड्यात आरसीबीचा फलंदाज लवनिथ सिसोदिया दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला होता. रजत पाटीदार हा लवनिथ सिसोदियाचा पर्यायी खेळाडू म्हणून आरसीबीच्या ताफ्यात सहभागी झाला होता.
रजत पाटीदारला आयपीएल २०२२ मध्ये २६ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. रजत पाटीदारने आयपीएल २०२२ मधील काही सामने बाकावर बसून काढले होते, पण त्याला २६ एप्रिल रोजी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदार फक्त १६ धावा करू शकला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी देखील केली होती. रजत पाटीदारने हंगामातील सातव्या सामन्यात धडाकेबाज शतक ठोकत तो संघाचा हुकुमी एक्का बनला होता.
रजत पाटीदार मध्यप्रदेश मधील इंदोर शहरातील रहिवासी आहे. रजत पाटीदारचा जन्म १ जून १९९३ साली झाला होता. वयाच्या आठव्या वर्षी रजत पाटीदारने क्लब क्रिकेट खेळायला सुरू केले होती. एक गोलंदाज म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारा पाटीदार १५ वर्षांखालील क्रिकेट खेळताना फलंदाज बनला होता.
महत्वाच्या बातम्या:-
‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं; पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ
गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं! डोक्यावर जखमांच्या खुणा; पोलिसांनी घेतली ‘ही’ ॲक्शन
वा रे पठ्ठ्या! तिकीटाच्या 2 रुपयांसाठी रेल्वेला खेचलं कोर्टात, शेवटी केस जिंकत मिळवले अडीच कोटी






