सध्या ज्ञानवापी मशीद प्रकरण चांगलच चर्चेत आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षण करत असताना या सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक झाला आहे. नंदीपासून ८३ फूट अंतरावर शिवलिंग असून या भिंतींवर त्रिशूळ आणि हत्तीच्या खुणा असल्याचा या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
वजूखान्यातील पाणी ओसरल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. वजुखान्यात पाणी भरले असून ते बाहेर काढले जात आहे. पाणी ओसरल्यानंतर त्याला शिवलिंगासारखा आकार आला आहे, असा दावा हिंदु पक्षाने केला आहे. हिंदु पक्षाचा हा दावा मुस्लिम पक्षाने फेटाळून लावला आहे.
शिवलिंगावर केलेल्या लहान खुणा, वरच्या बाजूला केलेले पाच कट आणि एक छिद्र दिसत असून ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सर्वेक्षण आयुक्त विशाल सिंह यांनी यासंदर्भात अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालानुसार सर्वेक्षण दरम्यान छिद्रात टाकलेली सळी केवळ ६३ सेंटीमीटरपर्यंत गेली आहे.
मशिदीच्या वर्तुळाबाहेर जाळीसारख्या भिंतीसमोर नंदी बसल्याचं चित्रातून स्पष्ट होत आहे. नंदीच्या समोरच असणाऱ्या जाळीच्या भिंतीच्या पलीकडे एक शेड बांधले आहे. या शेडच्या आत वजूखाना बांधला असल्याचं सिंह यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
मशिदीच्या आत बांधलेल्या भिंतींवर त्रिशुलचा आकार बऱ्याच ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. त्यावर रंगरंगोटी करून ते लपवले जात असल्याचा आरोप हिंदू पक्षाने केला आहे. त्याचबरोबर, मशिदीच्या भिंतींवर काही कलाकृती आहेत. मध्यभागी हत्तीची आकृती दिसते. भिंतींवर काही ठिकाणी स्वास्तिकच्या खुणा आहेत.
अशीच आकृती मशिदीच्या बाहेर असणाऱ्या भिंतीवर दिसली आहे. या भिंतीवर फुलासारखा आकार कोरून मध्यभागी एखाद्या घंटीसारखा आकार तयार करण्यात आला असल्याचा दावा हिंदू पक्षाने मंदिर असल्याचा पुरावा देताना केला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
कॉंग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार अन् सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
गुजरात टायटन्ससाठी ‘हा’ खेळाडू ठरला मॅच विनर, जिंकवून दिले तब्बल ९० टक्के सामने
अखेर ठरलं! काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश, काँग्रेसला धक्का