गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. (Ravi Rana criticize CM Uddhav Thakre)
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमान चरणी प्रार्थना करत आहोत”, अशा खोचक शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कटप्पाचा रोल करत आहेत”, असा खोचक टोला आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. यावेळी आमदार रवी राणांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप देखील केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना धोका दिला आहे, असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.
‘जे छत्रपतींचे झाले नाहीत ते महाराष्ट्राचे कसे होणार’, अशी खोचक टीका देखील आमदार रवी राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राणा दाम्पत्यावर सध्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३४१,१३५,२९१ आणि १४३ या कलमांखाली हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
यासंदर्भात राणा दाम्पत्याचे वकील दीपक शर्मा यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर यावर जामिनाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे वकील दीपक शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच सर्व गुन्हे बेल मिळण्यासारखे असल्याचे देखील वकील दीपक शर्मा यांनी सांगितले आहे. शनिवारी ३६ दिवसानंतर राणा दाम्पत्याचे अमरावतीत आगमन झाले.
यावेळी युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याचे जल्लोषात स्वागत केले. मिळालेल्या माहितीनुसार, चार पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी तब्बल दीडशे किलोच्या हारतुऱ्यांनी राणा दाम्पत्याचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच राणा दाम्पत्याची मिरवणूक देखील काढण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :-
या पाच कारणांमुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या
‘…असं केल्याने तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाऊ शकत नाही,’ ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या वानखेडेंचे ट्विट चर्चेत
गुजरात जिंकल्यानंतर सोशल मिडीयावर मोदी आणि अमित शहांचे ‘ते’ फोटो व्हायरल, फिक्सिंग केल्याचा होतोय आरोप