माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर(Shivsena) नाराजी दर्शविली आहे.(bjp atul bhatkhaklar tweet about cm uddhav thakare)
शिवसेनेने मला पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. पण शिवसेनेत प्रवेश करणार नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका होती. मला सगळी गणित माहित होती. मी खोटं बोलत असें तर मुख्यमंत्र्यानी सांगावं. मला खूप वाईट वाटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला दिलेला शब्द मोडला आहे”, असे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष केले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “संभाजी राजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले. आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं म्हणून अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत”, अशा आशयाचं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
संभाजी राजे छत्रपतीच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले.
आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं म्हणून अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2022
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. यावेळी पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “मी अपक्ष लढण्यावर ठाम होतो. मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो. शिवसेनेने मला पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती.” “पण शिवसेनेत प्रवेश करणार नाही, अशी माझी स्पष्ट भूमिका होती”, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, “शिवसनेच्या एका मंत्र्याने यामध्ये मध्यस्थी करत बैठक आयोजित केली. या बैठकीत सगळ्या गोष्टी फायनल करण्यात आल्या. काही शंका मला होत्या. त्या देखील मुख्यमंत्र्यानी दूर केल्या. त्यानंतर मी कोल्हापूरला निघून आलो”, असे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
“कोल्हापूरला आल्यानंतर मला संजय पवार यांच्या उमेदवारीबाबत समजलं. मला सगळी गणित माहित होती. मी खोटं बोलत असेन तर मुख्यमंत्र्यानी सांगावं. मला खूप वाईट वाटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला दिलेला शब्द मोडला आहे. मला सर्व पक्षांनी मदत करावी, अशी माझी भूमिका होती. पण मला पाठिंबा मिळाला नाही. या निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे, हे मला माहित होते”, असे देखील संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
चाहता म्हणाला, तुझं लग्न झालंय की सिंगल आहेस? शेवतांने खाजगी प्रश्नावर दिले ‘हे’ उत्तर
मॅनेजमेंट मुंबई संघावर नाराज, ‘या’ बड्या खेळाडूसह चार खेळाडूंची करणार संघातून हकालपट्टी
तो शहीद झाला असला तरी मला त्याचा अभिमान आहे कारण.., मुलाच्या हौतात्म्यावर वडीलही भावूक