Share

तुमची सत्ता असताना झोपला होता का? OBC आरक्षणावरून पवारांनी फडणवीसांना खडसावले

sharad pawar & devendra fadanvis

राज्यात सध्या महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला थेट आवाहन केलं आहे. “जातीनिहाय जनगणना करा. सत्य काय आहे हे ते बाहेर येऊ द्या”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.(Sharad Pawar criticize Fadnavis over OBC reservation)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “राज्यघटनेने एससी, एसटी समाजाला सुविधा दिल्या आहेत. एससी, एसटी समाजाला अधिकार देण्यात आले आहेत. समाजात हा मोठा वर्ग ओबीसी आहे. त्यांना आधार द्यायची गरज आहे. ओबीसी समाज सन्मानाने उभा राहत नाही तोपर्यंत गरज आहे. समाजाच्या उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की, “केंद्राने ओबीसी जनगणना करावी म्हणजे त्यानुसार न्याय वाटणी होईल, कुणी इथे फुकट मागत नाही. ज्याच्या हातात देशाची सूत्रे आहेत ते करतील असे वाटत नाही. यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. रस्त्यावर आल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही”, असे शरद पवार यांनी सांगितले.

“सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होईल. वस्तुस्थिती समोर आली तर अस्वस्थता येईल. न्यायालयाने जी माहिती मागितली त्याबद्दल डेटा गोळा करायचे काम सध्या सुरु आहे. माजी मुख्यमंत्री आज म्हणतात की धोका दिला. पण तुमच्या हातात पाच वर्ष सत्ता होती. देशात, राज्यात सरकार असताना तुम्ही झोपला होता का?” असा प्रश्न शरद पवार यांनी भाजपसमोर उपस्थित केला आहे.

आज मुंबईमध्ये राज्यस्तरीय ओबीसी आरक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शरद पवार यांनी भाषण केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी एका कार्यक्रमात जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं. जातीनिहाय जनगणना मला अजिबात मान्य नाही, असं विधान भैयाजी जोशी यांनी केलं होतं.

पुढील निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ज्या गोष्टी करता येतील. त्या मी नक्की करणार, असे शरद पवार म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातीनिहाय जनगणना मान्य नाही, त्यामुळे भाजप ती करणार नाही, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
सायकल सेकंड हॅंन्ड पण आनंद मर्सिडीज घेतल्यासारखा, तुफान व्हायरल होतोय चिमुकल्याचा व्हिडीओ
आधी ट्रेनमध्ये शेंगा विकायचा, नंतर केला २० हजार कोटींचा घोटाळा, कोण होता अब्दुल करीम तेलगी?
साखरपुडा झाला, गोव्यात ‘प्री वेडिंग’ फोटोशूट केलं अन् वराने लग्न मोडले; कारण वाचून धक्का बसलं!

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now