मुंबई इंडियन्सचां सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकरला या आयपीएल सिझनमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये १४ पैकी ४ सामने जिंकण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळाले आहे.
मुंबई इंडियन्सचं पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. मुंबईनं त्यांच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये अनेक बदल केले. मुंबई इंडियन्सने अनेक तरूण खेळाडूंचा टीममध्ये समावेश केला. पण, अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स एकही संधी दिली नाही. यामुळे अर्जुनने सलग दुसरा आयपीएल सिझन बेंचवरच काढल्याचे पहायला मिळालं आहे.
अर्जुन तेंडुलकरला आयपीएलपाठोपाठ मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड न झाल्याने निराशा झाली आहे. रणजी स्पर्धेच्या ‘नॉक आऊट’ राऊंडसाठी अर्जुनची मुंबईच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. ६ जूनपासून रणजी स्पर्धेच्या ‘नॉक आऊट’ राऊंडची सुरूवात होणार आहे.
उत्तराखंड विरूद्ध होणाऱ्या क्वार्टर फायनलसाठी मुंबईच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा रणजीपटू सरफराज खानचा लहान भाऊ मुशीर खानचा अर्जुन तेंडुलकरच्या जागी समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या रणजी टीमचा कर्णधार पृथ्वी शॉ आहे.
१८ वर्षाच्या मुशीर खानने कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेतील ९ मॅचमध्ये ६७ च्या सरासरीनं ६७० रन केले आहेत. मुशीरचा यामध्ये २ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. मुशीर खानने याचबरोबर ३२ विकेट्सही घेतल्या आहेत. कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईला पोहचवण्यात मुशीरचे फार मोठे योगदान होते.
मुंबईच्या टीममध्ये निवड झाल्यामुळे मुशीरनं आनंद व्यक्त केला आहे. ‘मी आणि माझा भाऊ सरफराज यांचं भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळण्याचं आणि वडिलांना खूश करण्याचं स्वप्न आहे. माझ्या निवडीसाठी मी एमसीएचा आभारी आहे. ही सुरूवात असून अजून बराच मोठा प्रवास करणे बाकी आहे, ‘ अशी प्रतिक्रिया मुशीरनं दिली आहे.
महत्वांच्या बातम्या:-
मोठी बातमी! महागड्या घडाळ्यांचे आमिष दाखवून ‘या’ क्रिकेटरने ऋषभ पंतला लावला १.६३ कोटींचा चुना
जगात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्सची मुंबईत चाहूल? महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे दहशतवादी कसाबसोबत संबंध”






