Share

प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या मुंबईला आणखी एक धक्का, पुढच्या IPL मध्येही अपयशच हाती?

mumbai

यंदाची आयपीएल मुंबई इंडियन्ससाठी खुप खराब ठरली आहे. यावेळी मुंबईच्या संघाला अनेक सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडावे लागले. अशात मुंबईच्या संघासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईने ८ कोटींना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला खरेदी केले होते. पण दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. पण पुढच्यावर्षी जोफ्रा आर्चर कामात येईल म्हणून त्याला खरेदी करण्यात आले होते. असे असताना आता तो त्याच्या दुखापतीमुळे पुढच्या वर्षीही आयपीएल खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.

जोफ्रा आर्चरची दुखापत काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पाठीच्या दुखापतीमुळे तो इंग्लंड क्रिकेटच्या संघातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर जुलै २०२१ पासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. तो शेवटी टी-२० ब्लास्टमध्ये सहभागी झाला होता.

सुमारे ९ महिन्यांनंतर, तो आगामी टी २० ब्लास्टमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण नव्या दुखापतीमुळे तो उर्वरित मोसमातून बाहेर पडला आहे. आर्चर हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा भाग आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या या मोसमात दूर राहिला होता.

इंग्लंडला पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरच्या उर्वरित हंगामातून बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे. ईसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन कधी होईल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही.

बोर्डाच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्याला उर्वरित हंगामातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या परतीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

जोफ्रा आर्चर जवळपास १६ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने भारताविरुद्ध २० मार्च २०२१ रोजी अहमदाबादमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर तो इंग्लंडच्या टी २० संघाचा भाग होता. याशिवाय तो २१ महिन्यांपासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
‘गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या’; केतकीच्या प्रकरणावर आव्हाडांची पोस्ट
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधीच मनसेला भलेमोठे भददाड; २० पदाधिकारी बांधणार शिवबंधन
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आर माधवनने केले पंतप्रधान मोदींचे कौतूक; म्हणाला, हा नवीन भारत…

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now