सध्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. हिंदू पक्षकारांनी दावा केला आहे की ज्ञानवापी मशिद आधी मंदिर होते. ते तोडून मशिद तयार करण्यात आली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी सुरु आहे. (delhi jama mosque vishnu temple)
जर मंदिर असल्याचे सिद्ध झाले, तर मुस्लिम बांधवांनी ती जमीन परत करावी. तसेच हा दावा खोटा असल्यास हिंदू पक्षाने शांततापूर्ण मार्गाने ही जमीन मुस्लिम समाजाला मशिदीसाठी द्यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. असे असतानाच आता भाजप खासदाराने एक मोठा दावा केला आहे.
भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले की, दिल्लीत ज्या ठिकाणी जामा मशीद बांधण्यात आली आहे, त्या ठिकाणीही मंदिर होते. ते म्हणाले की, यमुना नदीच्या काठावर विष्णूचे मंदिर आहे. २००९ सालापासून ते मथुराचे आमदार आहेत. तेव्हापासून अनेकदा त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा देशाच्या संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असायला हवा, असे मत खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी रेल्वे रोडवरील भगवान आश्रमात पोहोचले होते, त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता, तेव्हा ते बोलत होते.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे वास्तव समोर आले आहे. जिथे इतर पंथांच्या आक्रमकांमध्ये मंदिराचे रूप बदलून मशिदीत रूपांतरित केले. पण पाहणीनंतर आता सर्व गोष्टी समोर आल्या आहे. देशातील अनेक मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आले आहे, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मी मथुराचा खासदार होतो, त्यावेळी मी एक गोष्ट बोलली होती, ती म्हणजे जामा मशिद दिल्लीत लाल किल्ल्याच्या बाजूला बांधली गेली आहे. तिथे विष्णूचे मंदिर आहे, आज तिथे खोदून पाहणी केली तर तिथे फक्त मूर्त्या सापडतील. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूने त्यांचे म्हणणे नाकारले नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
टाटा समुह आक्रमक निर्णय घेणार! ‘हे’ पाच मोठे ब्रँड्स खरेदी करत देणार अंबानींला टक्कर
पॉलिटिकल थ्रिलर, क्राइम, बोल्ड इंटिमेट सीन; ‘रानबाजार’च्या ट्रेलरने मराठी सिनेसृष्टीत भूकंप
”भगवान विष्णुचे मंदिर पाडून दिल्लीची जामा मशिद उभारली, दावा खोटा निघाला तर कोणतीही सजा द्या”