Share

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं अभिनेत्री रवीना टंडनकडून समर्थन? ट्वीट तुफान व्हायरल

Raveena Tandon

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे  बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) हिचं एक नवीन ट्वीट तुफान व्हायरल होतं आहे. तर वाचा नेमकं काय आहे प्रकरण? काय आहे रवीना टंडन हिचं ट्विट..?

रवीनानं लेखक आनंद रंगनाथन यांचं ट्वीट शेअर यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. भारत एक स्वतंत्र देश आहे आणि इथे कोणालाही कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत,’असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सध्या रवीनाचं हे ट्विट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनकडून समर्थन करण्यात येत आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे. यामुळे रवीनाचं हे ट्विट सध्या चांगलच चर्चेत आहे.

यासोबतच आणखी एक ट्विट रवीनानं केलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये रवीनानं म्हंटलं आहे की, ‘पूर्वी माझ्या देशाला असहिष्णू असं लेबल लावणं एक फॅशन झाली होती. यावरून लक्षात येत की आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो, हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता आहे कुठे?’, असा सवाल तिने आपल्या ट्विटमधून केलं आहे.

दरम्यान, लेखक आनंद रंगनाथन यांनी आपल्या ट्विटमधून अकबरूद्दीन ओवेसी यांच्यावर टीकेचा भडीमार केला. फोटो शेअर करत जहरी शब्दात त्यांनी टिका केली आहे. ‘संभाजी महाराजांचा शिरच्छेद करणाऱ्या, काशी उद्ध्वस्त करणाऱ्या आणि 4.9 दशलक्ष हिंदूंची हत्या करणाऱ्या राक्षसाच्या कबरीवर जाऊन माथा टेकणं हे चिथावणीखोर मनोरूग्ण कृत्य असल्याच त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; कॉंग्रेसच्या राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट
शरद पवार देशात तिसरी आघाडी उभी करणार! नेतृत्व महाराष्ट्राकडे; वळसे पाटलांच्या संकेतांनी राजकारणात खळबळ
मृत्यूनंतर तब्बल ‘एवढी’ संपत्ती कुटुंबासाठी मागे सोडून गेले यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा, वाचून अवाक व्हाल
मेव्हण्याचे केले ३१ तुकडे, मग बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावावर झाडल्या ३१ गोळ्या, घटनेने शहर हादरले

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now