सध्या अभिनेत्री केतकी चितळे खूप चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती.(ajit pawar angry on ketaki chitale)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या पोस्टवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर खोचक टीका केली आहे. अभिनेत्री केतकी चितळेला चांगल्या मनोरुग्णालयात दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे.
“महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालतो. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला चांगल्या संस्काराचा वारसा घालून दिला आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका महाराष्ट्रात खपवून घेतली जात नाही”, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील अभिनेत्री केतकी चितळेवर जोरदार हल्लाबोल केला होता. हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात, लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला”, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचे साताऱ्यातील एक भाषण प्रचंड गाजलं होतं. या भाषणावेळी शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कविता म्हटली होती. या कवितेवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. या कवितेवरून भाजपने शरद पवारांवर टीका केली होती.
याच भाषणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांवर टीका करताना फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड.”
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! संतप्त महिलांनी केतकीचे तोंड केले काळे, पोलिस ठाण्यासमोरच घडली घटना
हार्दिकने अक्षयाला वाढदिवसाच्या दिल्या हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा; चाहते पण म्हणाले, चालतंय की…
वाद अंगावर घेण्याची सवयच आहे केतकीला! आजवर ‘या’ कारणांमुळे सापडलीय प्रचंड वादात