ही तर मानसिक विकृती’ पवारांवर आक्षेपार्ह लिहीणाऱ्या केतकी चितळेला राज ठाकरेंनी झापले, म्हणाले…

काल अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे(Ketaki Chitale) हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(mns raj thakre react on actress ketaki chitale conterversial post)

यावरून अभिनेत्री केतकी चितळे हीला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे. “ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही याचा तीव्र निषेध करतो”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रकामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिले की, “कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली.”

“खाली काहीतरी भावे वगैरे असं लिहून टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकात म्हंटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकात पुढे लिहिले की, “एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धी आपण ओळखतो..तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..!आमचे त्यांच्याबरोबरचे मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे.ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकात लिहिले आहे.

“असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धिमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!”, अशा आशयाचं पत्रक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
परीस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; आज भगवा मातीत नाही तर छातीत रोवायचा…
सुप्रीम कोर्टानेच रद्द केली बलात्काऱ्याची शिक्षा; म्हणाले आम्हाला त्यांच्या कौटूंबीक जीवनात अडथळा आणायचा नाही
शरद पवारांविरुद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह ट्वीटची मालिका संपेना; केतकी चितळेच्या पोस्ट नंतर ‘हे’ ट्विट तुफान व्हायरल