सध्या महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये सध्या खंजीर खुपसण्यावरून जुंपली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केला होता.(not well between in congress and rashtrvadi party)
तसेच या प्रकरणाचा लवकरच सोक्षमोक्ष लावण्यात येईल, असा इशारा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी पक्षाला दिला होता. जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर देखील राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
काही दिवसांपूर्वी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये चर्चा झाली होती. पण या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपकडून मदत घेतल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी पक्षावर जोरदार टीका केली आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “स्थानिक पातळीवर राजकारण वेगळं असतं. स्थानिक पातळीवरील राजकारणाचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी जयंत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रत्युत्तर देखील दिले आहे.
महाविकास आघाडीमधील नेत्यांनी खंजीर खुपसण्याची भाषा वापरू नये, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी देखील राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला शह दिला होता. काही दिवसांपूर्वी मालेगावमधील काँग्रेस पक्षातील २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
तसेच भिवंडीत देखील असाच काहीसा प्रकार घडला होता. राष्ट्रवादीने भिवंडीत काँग्रेस पक्षाचे १८ नगरसेवक पळवले होते. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद सुरु झाल्याचे सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वात जास्त निधी मिळत असल्याचा आरोप देखील केला होता. यामुळे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे चित्र उभे राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
…पवारांनी पुन्हा पाठीत खंजीर खुपसला! महाविकास आघाडीत बिघाडी; राज्यात खळबळ
तेलही गेले, तूपही गेले हाती मात्र..; ६ कोटी पाहून पोलिसांची नियत फिरली अन्…
भारतातील कोरोना मृत्यूसंख्या जास्त दाखवण्यामागे फार्मा कंपन्यांचे षडयंत्र?; मोदी सरकारच्या गंभीर आरोपांनी खळबळ