भोंदू बाबांबद्दल अंधविश्वास पसरवणाऱ्या अनेक बाबांबद्दल आपण ऐकले असेल. थावी नानरा असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 75 वर्ष आहे. थायलंडमध्ये या कथीत बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. या बाबासंदर्भात पोलिसांना अनेक गंभीर पुरावे मिळाले असून, याच पुराव्याच्या आधारे त्याला कठोर शिक्षा देण्याची तयारी सुरू केली आहे.
भोंदू बाबांबद्दल अनेक दावे देखील करण्यात आले आहेत की, त्याचे अनुयायी त्याचे मूत्र प्यायचे आणि त्याची विष्ठाही खात असत. असं केल्यानं रोगांपासून बचाव होतो असा अनुयायांनी दावा केला आहे. एवढेच नाही तर, असे केल्यास आपण आजारी पडणार नाही, असेही तो सांगत होता.
बाबाला उत्तर थायलंडमधील छैयाफुम जंगलातील त्याच्या घरी अटक करण्यात आली आहे. पोलीस या बाबाला ताब्यात घेत असताना बाबाच्या अनुयायांनी पोलिसांविरूध्द बंड केले होते. बाबाच्या आश्रमजवळ 11 मृतदेह सापडले आहेत. जे बाबांच्या अनुयायांचे मृतदेह असल्याचे मानले जात आहे.
खबऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार, एक महिला या बाबांकडे गेली होती. मात्र ती परत आलीचं नाही. यानंतर, या बाबासंदर्भात माहिती मिळाली. वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस या बाबाला अटक करण्यासाठी गेले असता बाबाचे अनुयायी आणि पोलिस यांच्यामध्ये झटपट झाली होती. मात्र पोलिसांनी बाबाला अटक केली आहे.
थावी नानरा यांच्या आश्रमावर छापा देखील टाकण्यात आला होता. छाप्यामध्ये असे आढळून आले की त्यांनी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. जे मृतदेह बाहेर काढण्यात आले ते सर्व शवपेटीमध्ये होते. त्यापैकी केवळ 5 मृतदेहांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळाले आहेत.
दरम्यान, थवी येथे गेलेली 80 वर्षीय महिला परत आलीच नाही. या महिलेच्या मुलीने देखील याची माहिती दिली आहे. अनुयायी लघवी पितात आणि विष्ठा देखील खातात जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग होऊ नये.
महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील, असं कधी वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस
शेततळ्याजवळ तीन मुलांच्या चप्पला दिसल्या अन् अख्खं सोलापूर हादरलं; घडलेली घटना वाचून बसेल धक्का
संगीत क्षेत्रातून आणखी एक दुःख बातमी; प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं निधन